
योगेश्वरी पतसंस्थेच्या वतीने एस पी कुलकर्णी सन्मानित सतत वीस वर्ष अध्यक्षपदावरून केला पतसंस्थेचा विकास - माजी अध्यक्ष एस पी कुलकर्णी अंबाजोगाई( वसुदेव शिंदे ) - परवा पतसंस्थेचे अध्यक्ष बी के मसने यांचा फोन आला. आपल्याला पतसंस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि जवळपास वीस वर्षांचा कालखंड आठवला. वीस वर्षे इतरांचे सत्कार करण्यात गेले. आज आपला सन्मान होणार. साहजिकच मन आनंदी होणार व वीस वर्षे सातत्याने पतपेढीत एकरूप होऊन काम केले, आपल्याला जे पद मिळाले ते जनसेवेसाठी होते ते मिरवण्यासाठी नव्हते हाच विचार. देह व देव यामध्ये देश आहे. याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. मानव सेवा हीच माधव सेवा समजून काम केले. अगदी वयाच्या 32 व्या वर्षी माझ्या गळ्यात पतपेढीचे अध्यक्षपदाची माळ पडली. तसे पाहिले तर माझा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही. काहीही माहित नाही. प्रथम निवडणुकीला उभा राहिलो व सभासदांनी मला निवडून दिले. पतसंस्थेचा माझ्या संबंध नोकरीला आल्याबरोबर आला. निवडणूक आल्यावर डोक्यातही नव्हते आपण अध्यक्ष व्हावे. पण नियतीने पहिल्यांच टर्ममध्ये अध्यक्षपदाची माळ घातली. तसे आम्ही...