पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी असल्यास सातबारा- आठ -अ मागणी करू नये - अनिल बोर्डे




गेवराई ,प्रतिनिधी :- राज्य सरकारने चालू वर्षापासून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्री स्टॅक योजनेच्या अंतर्गत मिळालेला फॉर्मर आयडी अनिवार्य केला आहे. 

फार्मर आयडी दिल्यानंतर कोणत्याही कागदपत्राची गरज शेतकऱ्यांना लागणार नाही पण महा डीबीटी पोर्टल अंतर्गत विविध योजनेचा शेतकऱ्याकडून सातबारा व आठ मागणी केल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात कृषी संचालकाने शेतकऱ्यांनी फॉर्म आयडी दिल्यानंतर इतर कागदपत्राची मागणी करू नये असे निर्देश दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यासाठी यंदाच्या खरीप हंगाम पिक विमा योजनेचा व इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी अनिवार्य असणार आहे अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत बीड ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्फत वारंवार फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन केलेले आहे. 

तरी सर्व शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी काढून घ्यावा यापुढे पिक विमा भरण्यासाठी व इतर शासकीय कामासाठी फॉर्मर आयडी ची आवश्यकता आहे. 

फॉर्मर आयडी असल्यानंतर सातबारा व आठ अ ची  मागणी करू नये. अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था अध्यक्ष व गेवराई मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.


-----------------------------------------------

Click:♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओबीसी सर्टिफिकेट अनिवार्य; जाचक अटिमुळे पालकवर्ग आक्रमक_

Click:● _खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशा सर्व प्रक्रियेचा बनाव: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल २४ लाखांची फसवणूक_

Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_

Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !