महाडायलेसिस सेंटरचे जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन 




आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून लवकरच परळी मध्ये MRI सेंटर सुरू करणार - डॉ संतोष मुंडे

परळी (प्रतिनिधी):दिनांक १३ जुलै

     आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुका व परिसरातील किडनी विकार रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे ८ डायलिसिस मशीन असणाऱ्या अद्यावत महाडालेसिसी सेंटरचे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय राऊत सर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे गटनेते अजय मुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष भैया धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,जेष्ठ नेते तुलशीराम पवार,एच एल एल लाइफ केयर कंपनीचे प्रशांत सर , रा का.चे डॉ. विनोद जगतकर सर, मनसेचे श्रीकांत पाथरकर, वैजनाथ कळसकर,हरीश नागरगोजे , शेख शरीफ भाई, युवक अध्यक्ष शेख एजाज़ भाई, राहुल तिड़के, मुंजभाऊ गुट्टे ख़तीब अथर परवेज़ सचिन स्वामी, लक्ष्मण गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 


   अशा या महाडायलेसिस सेंटरचे उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून लवकरच परळी तालुका व परिसरातील सर्व रुग्णांसाठी अद्यावत एम.आर. आय.सेंटर सुरू करू असे उद्गार दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी काढले.तसेच महाडालेसिस सुविधा मिळवून दिल्या बद्दल मा. आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले.

  

त्याच बरोबर या महाडालेसिससेंटर चे उद्घाटक बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय राऊत सर यांनी उद्घाटनपर बोलताना परळी उपजिल्हा रुग्णायास कोणत्याही योजनेसाठी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले.

   

उपजिल्हा रुग्णालय परळीमध्ये झालेल्या महाडायलिसिस  सेंटरमुळे किडनी विकार रुग्णांना आता त्यांच्या डायलेसिस साठी पुणे,छत्रपती संभाजीनगर,लातूर ,नांदेड अशा ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. आणि त्यांची होणारी आर्थिक व शारीरिक हेळसांडही आता होणार नाही. कारण आता या रुग्णांचे डायलेसिस उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथेच मोफत होणार आहे या सुविधेमुळे सर्व किडनी विकार असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

    अशा या महा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटना सोहळ्यास यशस्वी संपन्न करण्यासाठी एच एल एल लाईफ केअर लिमिटेडचे सीनियर मॅनेजर व्ही प्रशांत सर तसेच कॉलिटी सुनील व्हनमाने सर डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर राहुल तिडके सर तसेच महाडायलेसीसचे डॉ.श्रेयस कराड सर सीनियर टेक्निशियन मुंजाभाऊ गुट्टे सर टेक्निशियन अशोक शिंदे सर स्टाफ नर्स ईश्वर खरात सर आदींनी परिश्रम घेतले.


-----------------------------------------------

Click:♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओबीसी सर्टिफिकेट अनिवार्य; जाचक अटिमुळे पालकवर्ग आक्रमक_

Click:● _खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशा सर्व प्रक्रियेचा बनाव: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल २४ लाखांची फसवणूक_

Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_

Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !