खासदार झाले आता सरकारी वकील म्हणून काम करता येतं का?
उज्वल निकमांची राज्यसभेवर वर्णी, संतोष देशमुख केस पाहणार का? कायदा काय सांगतो?
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. उज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभेला उज्जल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते विशेष वकील म्हणून काम पाहू शकणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. उज्वल निकल संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस पाहणार की नाही याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा सदस्यपदावरील एखादी व्यक्ती “विशेष सरकारी वकील” (Special Public Prosecutor) म्हणून राहू शकत नाही. सामान्यतः एकाच वेळी एखाद्या व्यक्तीला राज्यसभेचा सदस्य आणि सरकारी वकील (विशेष सरकारी वकीलसुद्धा) ही दोन्ही पदं एकत्रितपणे भूषवता येत नाहीत.
Click:■ _मोठी बातमी: उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती_
यामागची कायदेशीर आणि व्यवहारिक कारणं:
1. हितसंबंधाचा संघर्ष (Conflict of Interest)
• राज्यसभा सदस्य म्हणजे संसद सदस्य (MP) — तो कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेतो.
• सरकारी वकील म्हणजे कार्यकारी (Executive) शाखेतील सरकारी प्रतिनिधी — तो राज्य/केंद्र सरकारच्या वतीने खटल्यात भूमिका बजावतो.
• या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये टोकाचा हितसंबंध असतो. त्यामुळे दोन्ही भूमिका एकत्र शक्य नाहीत
-----------------------------------------------
Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_
Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_
Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा