गाडीलोहार समाज युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - गेंदले महाराज
परळी (प्रतिनीधी ) येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडीलोहार समाज युवा प्रतिष्ठान परळी वैजनाथ च्या वतीने शुक्रवार दि.11जुलै रोजी मातृ-पितृ पूजन व अमृततुल्य प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ह.भ.प भागवताचार्य बाळासाहेब महाराज गेंदले यांनी सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडीलोहार समाज युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.
शहरातील नंदागौळ रोड वरील विश्वकर्मा मंदिर येथे गुरु पौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजन व तांबेश्वर संस्थांनाचे श्री.ह भ प स्वररत्न श्री भगवताचार्य बाळासाहेब महाराज गेंदले यांच्या अमृततुल्य श्रीगुरु प्रवचन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ह्या आनंदी महोत्सवास परिसरातील समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थिती दर्शविली.
-----------------------------------------------
Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_
Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_
Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा