योगेश्वरी पतसंस्थेच्या वतीने एस पी कुलकर्णी सन्मानित
सतत वीस वर्ष अध्यक्षपदावरून केला पतसंस्थेचा विकास - माजी अध्यक्ष एस पी कुलकर्णी
अंबाजोगाई( वसुदेव शिंदे )- परवा पतसंस्थेचे अध्यक्ष बी के मसने यांचा फोन आला. आपल्याला पतसंस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि जवळपास वीस वर्षांचा कालखंड आठवला. वीस वर्षे इतरांचे सत्कार करण्यात गेले. आज आपला सन्मान होणार. साहजिकच मन आनंदी होणार व वीस वर्षे सातत्याने पतपेढीत एकरूप होऊन काम केले, आपल्याला जे पद मिळाले ते जनसेवेसाठी होते ते मिरवण्यासाठी नव्हते हाच विचार. देह व देव यामध्ये देश आहे. याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. मानव सेवा हीच माधव सेवा समजून काम केले.
अगदी वयाच्या 32 व्या वर्षी माझ्या गळ्यात पतपेढीचे अध्यक्षपदाची माळ पडली. तसे पाहिले तर माझा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही. काहीही माहित नाही. प्रथम निवडणुकीला उभा राहिलो व सभासदांनी मला निवडून दिले. पतसंस्थेचा माझ्या संबंध नोकरीला आल्याबरोबर आला. निवडणूक आल्यावर डोक्यातही नव्हते आपण अध्यक्ष व्हावे. पण नियतीने पहिल्यांच टर्ममध्ये अध्यक्षपदाची माळ घातली. तसे आम्ही आक्रमक पण त्या पदावर बसल्याबरोबर हे पद आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. अध्यक्ष पदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. गरजवंतांच्या गरज भागवणे तेही कायद्याच्या चौकटीत बसवून सभासदांचा विश्वास संपादन केला. म्हणून एक नाही दोन नाही तब्बल वीस वर्षे पतसंस्थेच्या माध्यमातून काम करत राहिलो. या वीस वर्षात एक रुपयाही खाण्याचा मोह झाला नाही. उलट क्रांतिकारी निर्णय घेतले. सभासदांची हित जोपासली व सामाजिक पर्यावरणीय व राष्ट्रीय मूल्य यांची कास धरली. सभासदांच्या पाल्यांचा कौतुक सोहळा सुरू केला. त्यामुळे त्या सत्कारासाठी पूर्ण घर येत असे. त्यांच्याही मनात पतपेढी विषयी आदरभाव निर्माण होई. सभासदांची मुले प्रत्येक क्षेत्रात प्रवीण्य मिळवीत. त्यांच कौतुक सोहळा होत असे. सेवानिवृत्त व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सभासदांचा सत्कार होत असे. तसेच वीस वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, सैनिक, शहीद जवानांच्या माता पिता यांचा सत्कार, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने यांच्यामार्फत समाज प्रबोधन केले. ज्या ज्या वेळी देशावर आपत्ती आली त्या वेळी पतसंस्था अग्रेसर असे.
ही पतसंस्था 1977 पासून कॅशलेस व्यवहार करत आहे. एक रुपयाही भ्रष्टाचार होत नाही. सभासदकरिता नवीन नवीन योजना आणल्या. त्या योजनेतून सभासदांचा विकास करणे, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. माझे भाग्य हे आहे की माझ्या काळात तीन कर्मचारी नवीन भरती केले ते सुद्धा पारदर्शकपणे. तसेच अनेक सभासदांची लग्न दोन दिवसावर आले. पण पैसे नसे अशा सभासदाला इतर सभासदांना सांगून त्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न, त्यांची जामीन घ्यायला लावणे, कोणी आजारी असेल, कोणाचे घराचे बांधकाम असेल पाल्याचे शिक्षण असेल त्यावेळी त्यांना मदत करणे व आपल्यामुळे त्यांना आधार होई. तसेच बरेच कर्मचारी सावकारी कर्जबाजारी झाले त्यांना मानसिक आधार देणे. त्यांना सहकार्य करणे. असे समाज उपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचे भाग्य मला लाभले. सभासदांचे आजारपण ,शिक्षण, घर, लग्न किंवा काही लोक सावकारी कर्जाने त्रस्त अशा लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेऊन सहकार्य केले. पतसंस्थेत काही महत्त्वाचे निर्णय उदाहरणार्थ कर्ज सुरक्षा ठेव योजना ,ठेवी वाढवल्या, इतर आजारावर प्राचार्य बीके सबनीस योजना, कर्जाला सुरक्षितता, सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांना भेटवस्तू पर्यावरण जलसाक्षरता राष्ट्रीय एकात्मता अशा अनेक विषयांवर चर्चासत्र परिसंवाद आणि कार्यक्रमाचे नियोजन वीस वर्षाच्या काळात केली. निस्पृह सेवा एक रुपयाही भ्रष्टाचार नाही व कुठलाही गर्व ठेवला नाही सहकारातून समृद्धीकडे या तत्त्वानुसार एका तासात 26 लाखांपर्यंत कर्ज मर्यादा तसेच ससोटीने व्यवहार केले म्हणून महाराष्ट्रातील विविध नावलौकिक संस्थांचे पुरस्कार ची प्राप्त झाली ही कामे करता करता जानेवारी 2025 मध्ये सेवानिवृत्ती व चांगले व्यवस्थापन केल्यामुळे संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आली
पतसंस्थेच्या वतीने एस पी कुलकर्णी सन्मानित*
*सतत वीस वर्ष अध्यक्षपदावरून केला पतसंस्थेचा विकास - माजी अध्यक्ष एस पी कुलकर्णी*
*गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी*
अंबाजोगाई( वसुदेव शिंदे )- परवा पतसंस्थेचे अध्यक्ष बी के मसने यांचा फोन आला. आपल्याला पतसंस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि जवळपास वीस वर्षांचा कालखंड आठवला. वीस वर्षे इतरांचे सत्कार करण्यात गेले. आज आपला सन्मान होणार. साहजिकच मन आनंदी होणार व वीस वर्षे सातत्याने पतपेढीत एकरूप होऊन काम केले, आपल्याला जे पद मिळाले ते जनसेवेसाठी होते ते मिरवण्यासाठी नव्हते हाच विचार. देह व देव यामध्ये देश आहे. याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. मानव सेवा हीच माधव सेवा समजून काम केले.
अगदी वयाच्या 32 व्या वर्षी माझ्या गळ्यात पतपेढीचे अध्यक्षपदाची माळ पडली. तसे पाहिले तर माझा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही. काहीही माहित नाही. प्रथम निवडणुकीला उभा राहिलो व सभासदांनी मला निवडून दिले. पतसंस्थेचा माझ्या संबंध नोकरीला आल्याबरोबर आला. निवडणूक आल्यावर डोक्यातही नव्हते आपण अध्यक्ष व्हावे. पण नियतीने पहिल्यांच टर्ममध्ये अध्यक्षपदाची माळ घातली. तसे आम्ही आक्रमक पण त्या पदावर बसल्याबरोबर हे पद आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. अध्यक्ष पदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. गरजवंतांच्या गरज भागवणे तेही कायद्याच्या चौकटीत बसवून सभासदांचा विश्वास संपादन केला. म्हणून एक नाही दोन नाही तब्बल वीस वर्षे पतसंस्थेच्या माध्यमातून काम करत राहिलो. या वीस वर्षात एक रुपयाही खाण्याचा मोह झाला नाही. उलट क्रांतिकारी निर्णय घेतले. सभासदांची हित जोपासली व सामाजिक पर्यावरणीय व राष्ट्रीय मूल्य यांची कास धरली. सभासदांच्या पाल्यांचा कौतुक सोहळा सुरू केला. त्यामुळे त्या सत्कारासाठी पूर्ण घर येत असे. त्यांच्याही मनात पतपेढी विषयी आदरभाव निर्माण होई. सभासदांची मुले प्रत्येक क्षेत्रात प्रवीण्य मिळवीत. त्यांच कौतुक सोहळा होत असे. सेवानिवृत्त व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सभासदांचा सत्कार होत असे. तसेच वीस वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, सैनिक, शहीद जवानांच्या माता पिता यांचा सत्कार, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने यांच्यामार्फत समाज प्रबोधन केले. ज्या ज्या वेळी देशावर आपत्ती आली त्या वेळी पतसंस्था अग्रेसर असे.
ही पतसंस्था 1977 पासून कॅशलेस व्यवहार करत आहे. एक रुपयाही भ्रष्टाचार होत नाही. सभासदकरिता नवीन नवीन योजना आणल्या. त्या योजनेतून सभासदांचा विकास करणे, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. माझे भाग्य हे आहे की माझ्या काळात तीन कर्मचारी नवीन भरती केले ते सुद्धा पारदर्शकपणे. तसेच अनेक सभासदांची लग्न दोन दिवसावर आले. पण पैसे नसे अशा सभासदाला इतर सभासदांना सांगून त्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न, त्यांची जामीन घ्यायला लावणे, कोणी आजारी असेल, कोणाचे घराचे बांधकाम असेल पाल्याचे शिक्षण असेल त्यावेळी त्यांना मदत करणे व आपल्यामुळे त्यांना आधार होई. तसेच बरेच कर्मचारी सावकारी कर्जबाजारी झाले त्यांना मानसिक आधार देणे. त्यांना सहकार्य करणे. असे समाज उपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचे भाग्य मला लाभले. सभासदांचे आजारपण ,शिक्षण, घर, लग्न किंवा काही लोक सावकारी कर्जाने त्रस्त अशा लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेऊन सहकार्य केले. पतसंस्थेत काही महत्त्वाचे निर्णय उदाहरणार्थ कर्ज सुरक्षा ठेव योजना ,ठेवी वाढवल्या, इतर आजारावर प्राचार्य बीके सबनीस योजना, कर्जाला सुरक्षितता, सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांना भेटवस्तू पर्यावरण जलसाक्षरता राष्ट्रीय एकात्मता अशा अनेक विषयांवर चर्चासत्र परिसंवाद आणि कार्यक्रमाचे नियोजन वीस वर्षाच्या काळात केली. निस्पृह सेवा एक रुपयाही भ्रष्टाचार नाही व कुठलाही गर्व ठेवला नाही सहकारातून समृद्धीकडे या तत्त्वानुसार एका तासात 26 लाखांपर्यंत कर्ज मर्यादा तसेच ससोटीने व्यवहार केले म्हणून महाराष्ट्रातील विविध नावलौकिक संस्थांचे पुरस्कार ची प्राप्त झाली ही कामे करता करता जानेवारी 2025 मध्ये सेवानिवृत्ती व चांगले व्यवस्थापन केल्यामुळे संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आली.
-----------------------------------------------
Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_
Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_
Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा