पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन
परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतलं.
जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावेळी त्यांच्यासमवेत बंधू अशोक मोदी हेही उपस्थित होते. प्रभू वैजनाथच्या दर्शनानंतर त्यांनी देशातील नागरिकांसाठी सुख-समृद्धी व जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळीकरांच्या वतीने आत्मीय स्वागत....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी, पंतप्रधानांचे बंधू अशोक मोदी व अन्य सर्व नातेवाईकांनी वैद्यनाथ दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात तमाम परळीकर यांच्या वतीने त्यांचे आत्मीय स्वागत करण्यात आले. यावेळी आ.धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आत्मीय स्वागत केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा