अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS-भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस विशेष डिजिटल पेज.........

 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस विशेष डिजिटल पेज.........

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

स्वाभिमानी नेतृत्व...........

                                                        ✍️✍️✍️✍️

                                                  🕳️प्रदीप कुलकर्णी

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••  गोपीनाथ मुंडे हे नांव जगाला विसरू देणार नाही ' अशी शपथ घेऊन राजकारणात दमदार वाटचाल करत समाजातील वंचित, पिडित घटकाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक धडपड करणारं स्वाभिमानी नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडे यांच्याकडे आज पाहिलं जातं. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षम राजकीय वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात असताना राजकारणा सोबतच समाजकारणातही कायम आघाडीवर असलेलं हे व्यक्तिमत्व.. समाजातील वंचित, पिडित घटकांच्या सेवेसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या मुंडे साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेत, येणा-या प्रत्येक संकटावर मात करत अविरतपणे वाटचाल करणारं हे धुरंधर नेतृत्व...


पंकजाताई मुंडे यांची राजकीय कारकिर्द सुरवातीपासून ते आतापर्यंत तशी संघर्षाचीच.. तरीही मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग त्यांनी लोकांच्या भल्यासाठीच केला. एक सरळमार्गी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे. जनतेच्या अडी अडचणीला धाऊन जाणारं, त्यांच्या वेदना समजून घेणारं व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांचेकडं पाहिलं जातं. मंत्री म्हणून काम करताना जलसंधारण, ग्रामविकास,महिला व बालविकास, रोजगार हमी योजना अशी चार चार खाते यशस्वीपणे सांभाळून त्या खात्यांना त्यांनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला, एवढेच काय, या खात्यांना आपल्या जनाभिमुख निर्णयांनी आणि स्वकर्तृत्वाने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून दिले. या खात्याच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ तर त्यांनी गोरगरिबांपर्यंत पोहोचविलाच परंतु त्याचबरोबर अनेक नव नवीन योजना अंमलात आणून लोक कल्याणाची एक अनोखी संकल्पना रूजविली.

    सत्तेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवल्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली, ज्यामुळं अनेकांची पोटं दुखली. कट कारस्थानांच्या राजकारणातुन त्यांची प्रतिमा हनन करण्याचा डाव पारंपारिक विरोधकांकडून रचला गेला.परंतु प्रत्येक 'विजयात संघर्ष' आणि प्रत्येक 'संघर्षात विजय' या लोकनेत्याच्या समीकरणाची शिकवण व संस्काराच्या शिदोरीवर त्यांनी इथेही विजय मिळवला. वंचित, शोषित, बहुजनांच्या हितासाठी मुंडे साहेबांचा वसा घेऊन सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास रोखण्याचा अनेक राजकीय महारथींनी निष्फळ प्रयत्न केला व आजही सुरू आहे, परंतु संघर्षाची शिकवण व जनसामान्यांचे असीम पाठबळ लाभल्याने त्यांना रोखणे कुणालाही शक्य झाले नाही व पुढेही होणार नाही.

तसे, पाहिले तर 'संघर्षकन्या ते विकासकन्या' या प्रवासात पंकजाताईंच्या राजकारणाचा आलेख हा नेहमीच चढता राहिला आहे. पहिल्यांदा आमदार आणि त्यानंतर दुस-यांदा पुन्हा आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अतिशय यशस्वीपणे काम केले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्यप्रदेशच्या सह प्रभारी म्हणून आज पक्ष नेतृत्वाने त्यांचेवर जबाबदारी सोपवली आहे. मागील महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या प्रश्नांवर राज्यभरात रास्ता रोको आंदोलन झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. या भूमिकेमुळे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पाच जिल्हा परिषदा व काही पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित केल्या, ही त्यांच्या नेतृत्वाची चुणूकच म्हणावी लागेल.

          मोठया माणसांचा वारसा चालवणं हे तसं एक आव्हानच असतं, ते पेलणं सर्वानाच शक्य होत असं नाही पण पंकजाताई मात्र याला अपवाद आहेत. मुंडे साहेबांचा वारसा होणं म्हणजे त्यांच्या सत्ता, संपतीचा वारसा होणं नाही, तर त्यांच्या आदर्श विचारांचा..वंचित, पिडित, शोषित, दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा.. आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा वारसा चालवणं..जे काम पंकजाताई आपल्या राजकीय जीवनात सातत्याने करत आल्या आणि पुढेही अव्याहतपणे करतील. सामाजिक बांधिलकी जोपासताना 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही ' हे त्यांनी केवळ बोलून नव्हे तर आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असे एक व्यासपीठ आहे की त्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाज कार्याला वाहून घेतले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी केवळ रस्ते, इमारतीच बांधल्या नाहीत तर माणसं जोडण्याचे देखील काम केले. महा आरोग्य शिबीर, दिव्यांगांना साहित्य वाटप, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबियांना मदत, बेरोजगारांना नोक-या, गरजू रूग्णांची आरोग्य तपासणी व महागड्या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या. मराठवाडयातील पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर औरंगाबादेत उपोषण केले. लाॅकडाऊन काळात राज्यातील विविध साखर कारखान्यांवर अडकलेल्या ऊसतोड कामगारांना स्वगृही पाठविण्यासाठी सरकारला भाग पाडले. एवढेच नव्हे तर कोरोना संकटात गोरगरीब, गरजू नागरिकांना घरपोच रेशन व जीवनावश्यक साहित्य वाटप केले, केवळ परळीच नाही तर हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविला. एवढेच नाही तर कोरोना काळात परळी व शिरूर कासार येथे आयसोलेशन सेंटर सुरू करून रूग्णांसाठी सेवा यज्ञ उभारला. सत्ता असो वा नसो मुंडे साहेबांचा माणसं जोडण्याचा सक्षम वारसा त्यांनी कायम जपला. आपल्या कामांतून त्यांनी वंचित, उपेक्षित घटकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजातील जातीभेद झूगारून एक माणूस म्हणून विविध घटकांना आपुलकीने जोडण्याचे काम केले. सर्व सामान्य माणसासाठी अहोरात्र काम करण्याच्या स्वभावामुळे आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत लोकनेत्याचा खरा वारसा त्या आज पुढे नेत आहेत. लोकांना त्यांच्या रूपात मुंडे साहेबच दिसतात, त्यामुळेच हा वारसा जीवापाड जपण्याचे काम समाजातील अठरा पगड जातीचे लोक आज करत आहेत, त्यांच्यावर येणारा प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी कार्यकर्ते सदैव तयार असतात. लोकनेत्याचा हा वारसा आपणच आहोत असे सांगणा-यांना मात्र ही गोष्ट या जन्मात शक्य होणार नाही. हे स्वाभिमानी नेतृत्व संघर्षाच्या अग्नितून बाहेर पडून पुन्हा तितक्याच रूबाबात आत्मविश्वासाने वाटचाल करेल, यात तीळमात्र शंका नाही...आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा..!

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 


निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोच्या वतीने पंकजा मुंडेंच्या वाढदिवसा निमित्त उड्डाणपुला वरील खड्डे बुजवून सेवाकार्य 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या  वाढदिवसानिमित्त सत्ताधारी आघाडी सरकारला व स्थानिक प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी लक्षवेधी उपक्रम राबविण्यात आला. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपूलावरील खड्डे बुजवून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. इथले सत्ताधारी डोळे बंद करून बसलेले आणि झोपी गेलेले आहेत.या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी भाजयुमोच्या वतीने यापुढे रस्त्यावर उतरणार असल्याचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी सांगितले.
       शहराचा मध्यवर्ती वाहतुकीचा दुवा असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर ठिक ठिकाणी मोठ मोठे खड्डे झाले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे वारंवार वाहतूक खोळंबलेली असते नागरिकांना याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. याकडे कोणाचे लक्ष नाही सत्ताधारी विकासाच्या फक्त गप्पा मारतात प्रत्यक्षात मात्र याकडे दुर्लक्ष करतात. शहरातील नागरी समस्या वर लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून व सेवाकार्य करुन वाढदिवस करा हा पंकजा मुंडे यांचा संदेश लक्षात घेऊन दि.25 जुलै रोजी  शहरातील उड्डाणपुलावरील खड्डे बुजवुन भाजयुमो ने  अनोख्या पद्धतीने उपक्रम राबविला. या उपक्रमात मोठ्या संख्येने भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन- संजय मुंडे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     लोकनेत्या तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील टोकवाडी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे युवा नेते संजय मुंडे यांनी केले आहे. 
              राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री तथा महाराष्ट्राच्या रणरागिणी ओबीसी समाजाच्या झुंजार नेत्या पंकजाताई मुंडे यांचा 26 जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व गर्दी न करता टोकवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, श्री प्रभू रत्नेश्वरास अभिषेक पेढे व फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. 
        या कार्यक्रमास नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष टोकवाडी व भाजपाचे युवा नेते  संजय मुंडे व पदाधिकारी यांनी केले आहे.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन;मोठ्या संख्येने उपस्थित रहा-राजेश गिते
परळी (प्रतिनिधी) भाजपा राष्ट्रीय सचिव तथा मा ग्राम विकास मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमास जिल्हा परिषद गटातील सर्व भारतीय जनता पक्षाच्यापदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य राजेश गिते यांनी केले आहे. मा पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत ज्या मध्ये. निराधार वृध्दांना ब्लॅंकेट वाटप,कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना साडी चोळी भेट, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,कोरोना योध्दांचा सन्मान, आणि वृक्षारोपण असे कार्यक्रम दादाहारी वडगांव या ठिकाणी २६/१२/२०२१रोजी सकाळी १०वाजता आयोजित करण्यात आला आहे,. तरी गटातील सर्व गावां मधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सरपंच, चेअरमन,शक्ति केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गट प्रमुख राजेश गिते यांनी केले आहे

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?