*कै.कोंडिबा गित्ते यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रम.......



◆ _*कै.कोंडिबा गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमानिमित*_ ◆

● _*ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांचे किर्तन*_ ●

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  तालुक्यातील मौजे मलकापूर येथील कै.कोंडिबा महादबा गित्ते यांच्या वर्षश्राध्दच्या कार्यक्रमानिमित्त मंगळवार, दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 02 दरम्यान प्रसिद्ध किर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री टोकवाडीकर (झी टाँकीज फेम) यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आला आहे. तरी पंचक्रोशीतील मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गित्ते कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
      येथील माजी सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान सदस्य कै.कोंडिबा महादबा गित्ते एक प्रगतशील शेतकरी म्हणुन ओळखले जात होते. तब्बल पंधरा वर्षे  त्यांनी लमाण तांडा ग्रुप ग्रामपंचायतचे गावचं सरपंच पद त्यांनी सांभाळलं. तसेच परळी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन व सदस्य पद ही त्यांनी सांभाळले आहे. वारकरी संप्रदायात त्यांचा नेहमीचा सहभाग होता. ते धार्मिक आणि सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. गतवर्षी आँगस्ट महिन्यात वृध्दपकाळाने त्यांचे निधन झाले. येत्या 11 सप्टेंबर रोजी वर्षश्राध्दाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मंगळवार, दि.11 सप्टेंबर  रोजी दु.12 ते 2 प्रसिद्ध किर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री टोकवाडीकर (झी टाँकीज फेम) यांचे किर्तन होणार असून दुपारी  2 ते 5 वा. भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.
    तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक,भाविक भक्तांनी तुकाराम महाराज मुंडे यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी मलकापूर, ता.परळी वैजनाथ येथे उपस्थित रहावे असे आवाहन मधुकर कोंडिबा गित्ते फुलचंद कोंडिबा गित्ते, नातु आनंत मधुकर गित्ते, केशव फुलचंद गित्ते, वैभव फुलचंद गित्ते, ज्ञानेश्वर मधुकर गित्ते, महादेव फुलचंद गित्ते व गित्ते परिवारांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !