MB NEWS:*अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे* *13 कोटीचे 8 दिवसात वितरण*

 *अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे*


*13 कोटीचे 8 दिवसात वितरण*



मुंबई दि. 28. अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार  असून त्यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12. 98 कोटीचा मार्जिन मनी  वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 


मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व  सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योगासाठीच्या योजना बाबत झालेल्या आढावा बैठकीत श्री मुंडे बोलत होते .


मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत आढावा बैठकीत श्री मुंडे बोलत होते . यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,लीडकाॅमचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम,  डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष कांबळे,रवी घाटे,  डिक्कीचे सदस्य ,अनेक लघुउद्योगाचे प्रतिनिधी 

व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

     श्री मुंडे म्हणाले,  अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकाराचे लघुउद्योग सुरू करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य यांचा कृतीआराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव ,समाजकल्याण आयुक्त,डिक्कीचे प्रतिनिधी, लीडकाॅमचे प्रतिनिधी   तसेच बँकर्स यांची  संयुक्त समिती स्थापन केली आहे. समिती कृतीआराखडा तयार  करून पुढील बैठकीत अहवाल सादर करेल . जिथे कच्चा माल उपलब्ध असेल तिथे त्याचे उत्पादन करून मोठ्या  महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार  आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केला जाईल.


 15 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी 15 टक्के मार्जिन मनी वितरीत करण्यात येईल. 

तालुकास्तरावर नवउद्योजकांमार्फत सेवा व उत्पादन पुरविणारी साखळी निर्माण करून त्यातूनच हे नवउद्योजक तयार करणार, डिक्कीच्या सहकार्याने अनुसूचित जातीसाठी आर्थिक विकासाच्या योजना राबवण्यात येऊन अनुसूचित जाती चा आर्थिक व सामाजिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच डिक्की व लीडकाॅम यांच्या सहकार्याने चर्मोद्योगाला चालना देणार.स्टॅड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देणार असल्याचेही श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले. 


  या बैठकीत NOGA, MAIDC, BVG,  A Store , लीडकाॅम शाॅपी ,ले धारावी या लघुउद्योग कंपन्यांनी आपले सादरीकरण सादर केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !