MB News:व्यापारी व नागरिकांनी स्वतःची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी-चंदुलाल बियाणी

 

व्यापारी व नागरिकांनी स्वतःची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी-चंदुलाल बियाणी

टेस्ट विनामूल्य; 15 मिनिटात मिळणार रिपोर्ट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)

बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई, माजलगाव आणि केज येथे दि. १८ ऑगस्टपासून तीन दिवस अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत असून कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आपल्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदरची टेस्ट महत्वाची असल्याने व्यापारी व नागरिकांनी आपापली अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा आरोग्य मित्रचे अध्यक्ष, नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. केवळ १५ मिनिटात अ‍ॅन्टीजेन टेस्टचा रिपोर्ट येणार असून ही टेस्ट पुर्णपणे विनामूल्य असल्याचे त्यांनी सांगीतले.

बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा रुग्ण तातडीने तपासला जावा या दृष्टीकोनातून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात दि. १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव येथे व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट होणार आहे. साधारणपणे व्यापार्‍यांचा नागरिकांशी अधिकचा संबंध असल्याने सुरुवातीला बीड आणि गेवराई येथे अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये व्यापार्‍यांची कोरोना रुग्णसंख्या अधिक होती. या पार्श्वभुमीवर परळीसह ४ ठिकाणी उद्यापासून अ‍ॅन्टीजेन टेस्ट होत आहेत. व्यापारी बांधवांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक असून टेस्ट न केल्यास त्यांना आपला व्यवसाय उद्योग सुरु करता येणार नाही हे या ठिकाणी महत्वाचे आहे.

विविध शहरात विविध ठिकाणी टेस्ट सेंटर तयार करण्यात आली असून विभागानुसार कोणत्या व्यापार्‍यांनी कोणत्या केंद्रावर अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी स्वॅब द्यायचा आहे त्याची निश्चिती करण्यात आलेली आहे. कन्टेटमेन्ट भागातील नागरिकांना टेस्टसाठी ३ दिवस मिळणार असून त्यांनाही विविध ठिकाणी सेंटर उभारण्यात आलेले आहेत. सदरची टेस्ट पुर्णपणे मोफत असून नागरिकांनी न घाबरता आपला स्वॅब द्यायचा असल्याचे चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. बियाणी यांनी मागील महिन्यातच ना.धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी बीड यांना कोरोनाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी, कोरोना रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची मागणी केली होती. या महत्वाच्या मागणीला प्रशासनाने मान्यता देत अ‍ॅन्टीजेन टेस्ट सुरु केल्या आहेत.

दरम्यान, आपण व आपल्या कुटूंबीयांच्या कोरोना सुरक्षेसाठी अ‍ॅन्टीजेन टेस्ट उपयुक्त असल्याने व्यापारी व नागरिकांनी आपापली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा आरोग्य मित्रचे अध्यक्ष, नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार