केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
BREAKING NEWS: राडा ;एक ठार
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !
पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट: परळीत पोलिसांनी एकाला केली अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी... भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार परळी शहरातील गणेशपार भागात राहणारा गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओखाली पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वाक्य लिहून ही पोस्ट व्हायरल केली.यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सखोल चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस कर्म...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
परळीतील बहुचर्चित व्यापारी अपहरण प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह परळी पोलिसांनी पकडले- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा..... परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमाला सह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन दिली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, एक रिवाल्वर सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की, पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126 (2),140(2),308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन. एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी बे.ता. परळी जि. बीड, यांनी फिर्याद द...
परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात
परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा- परळी तालुक्यातील मरळवाडीच्या सरपंच खून प्रकरणात पोलीस वेगाने तपास करीत असुन जलद तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.या अनुषंगानेच आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना केज आणि धारूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली तीन वाहनेही पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला. यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खूनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. या आरोपीना ...
परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !
माजलगाव पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात;28 हजाराची लाच घेतांना पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... माजलगाव पाटबंधारे विभाग परळी (वर्ग 1) कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर या लोकसेवकास तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात गाळ व माती काढण्याची परवानगी मिळण्यासाठी 28 हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड युनीटने ही कारवाई केली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील 35 वर्षिय तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील त्यांचे 5 सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात गाळ व माती काढण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हे अर्ज कार्यालयीन प्रक्रियेनुसार लोकसेवक राजेश सलगरकर यांचे...
धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना
परळीजवळ मोठी दुर्घटना: मलकापुर शिवारात रेल्वेने एका मेंढपाळासह 22 मेंढ्या 2 गुरे ठार परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.... परळी वैजनाथ पासून अगदी जवळच असलेल्या मलकापूर शिवारात मोठी भीषण दुर्घटना घडली असुन 22 मेंढ्या, दोन गुरे व एका मेंढपाळाचा या दुर्घटनेत रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी १० वा. घडली आहे. या घटनेने परळी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परळी शहरातील धनगर गल्ली येथील मधुकर सरवदे व मुंजा मुक्तीराम डोणे रा.उखळी,ह.मु.परळी हे दोघे रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी जात होते. रविवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपल्या मेंढ्या चारण्यासाठी परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापुर शिवारात समोरुन आलेल्या मालगाडीने मेंढ्या,दोन जनावरांना चिरडले.दोन्ही बाजुने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्याने मेंढपाळ मुंजा डोणे हे देखील या दुर्घटनेत सापडुन ठार झाले.या दुर्घटनेत सरवदे यांच्या 22 मेंढ्या व दोन जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
न.प. परळी वैजनाथ: जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण व शासकीय कामात अडथळा आणला; माजी नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी नगर परिषद कार्यालयात घरकुल विभागातील एक करमचारी शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. या कर्मचाऱ्यांस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद या न प कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, न प कर्मचारी फिर्यादी सिद्धार्थ भारत गायकवाड वय 30 वर्ष, व्यवसाय- नौकरी (MIS स्पेशालीस्ट) नगर परीषद परळी हे शासकीय कामकाज करित असताना यातील आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस कामकाजा बाबत विचारणा केली व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताबुक्काने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन आरोपी- 1) अन्वर मीश्कीन शेख 2) शेख अजीज इस्माईल 3) शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुरन - 194/2024 कलम 132,121 (1), 352, 351 (2),351(3),...
परळी- नंदागौळ रस्त्यावर आढळला मृतदेह परळी वैजनाथ ,प्रतिनिधी परळी - नंदागौळ रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ३५-४० असलेल्या इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. तो वेडसर असून मागील काही दिवसापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात फिरत होता. तरी त्याचेबाबत अगर नातेवाईकबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार
परळी विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार मैदानात: निवडणुकीत दोन राजेसाहेब देशमुख परळी वैजनाथ, प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारी अर्जांपैकी केवळ अकरा अर्जाच शिल्लक राहिले आहेत. प्रबळ दावेदार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट होणार आहे. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वै ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा