MB NEWS:_कोरोनामुक्त परळीचा परळीकरांचा एकमुखी निर्धार_•


*परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम सुरू;व्यापारी व नागरीकांचा स्वयंस्फुर्त प्रतिसाद*


• _कोरोनामुक्त परळीचा एकमुखी निर्धार_•


परळी वैजनाथ /प्रतिनिधी

         परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट घेण्यासाठी चार  केंद्रावर आरोग्य प्रशासनाची टिम सज्ज झाली आहे.परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम सुरू झाली असुन व्यापारी व नागरीकांचा स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.टेस्टनंतर प्रत्येकाला १५ते २० मिनिटांत रिपोर्ट कळणार आहे. छत


       परळी शहरात कार्यान्वित केलेल्या चार अॕन्टीजन टेस्ट बुथचे नोडल आफिसर म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ दिलिप गायकवाड काम पाहात आहेत व या चार बुथच्या प्रत्येक बुथवर एक डॉक्टर,दोन टेक्निशन,एक वार्ड बाॕय,चार शिक्षक ,चार डाटा आॕफरेटर,दोन पोलिस कर्मचारी,एक वाहन,एक फिरते वाहन,दोन अंबुलन्स,दोन स्कुल बस अदी यंञणा बुथ निहाय सज्ज झाली आहे.

अॕन्टीजन तपासणी करुन घेत असलेल्या नागरिकांना अवघ्या 15 मिनिटांत आपला रिपोर्ट तपासणी केलेल्या बुथवर मिळणार आहे.

     लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर,श्री सरस्वती विद्यालय,बस स्थानक व सावतामाळी मंदीर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अॕन्टीजन टेस्ट बुथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या वेळेत व नियोजित केलेल्या प्रोग्राम नुसार आपली अॕन्टीजन टेस्ट करुन घ्यावी असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !