परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू !

 

राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू !


  नागपूर: काँग्रेसच्या नेतृत्त्वावरून सुरु असलेल्या राजकीय घुसळणीमुळे आता महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. 

मात्र, त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातील पत्रकारपरिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाऊ नये, अशी राहुल गांधी यांची इच्छा होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यास काँग्रेसची भूमिका काय असेल, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. त्यावर वडेट्टीवार यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकासआघाडी मध्ये सहभागी झाला होता. उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की सरकार मधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. 


याशिवाय, काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी स्वपक्षीयांवर केलेल्या टीकेसंदर्भातही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. काँग्रेस म्हणजे काही भाजप नाही, दोन हुकूमशाह सर्व करतायेत अशी स्थिती आमच्याकडे नाही. तरीही मला वाटते गांधी परिवाराकडे नेतृत्व असावे. त्यांच्यातच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!