MB NEWS:भाजपच्या 'या' नेत्यांच्या साखर कारखान्यांना 'महाविकासआघाडी' सरकारची हमी*


*भाजपच्या या नेत्यांच्या साखर कारखान्यांना 'महाविकासआघाडी' सरकारची हमी*

----------------------------------- 

 मुंबई : राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. या कारखान्यांमध्ये महाविकासआघाडीतील नेत्यांच्या कारखान्यांबरोबर भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे.


राज्यात मागील वर्षी आणि यंदा चांगला पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाल्याने ऊसाच्या पिक क्षेत्रात वाढ झाली आणि पर्यायाने ऊसाचे पिकही मुबलक आले. मोठ्या प्रमाणावर असलेल्या या ऊसाचे गाळप करण्याचं आव्हान राज्य सरकार समोर आहे. त्यातच राज्यातील काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत. या कारखान्यांना कर्ज उपलब्ध झाले नाही, तर त्याचे गाळप होऊ शकणार नाही. त्यामुळेच अडचणीत असलेल्या ३० साखर कारखान्यांच्या ३७१ कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या उपसमितीने तयार केलाय. या कारखान्यांमध्ये महाविकासआघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांच्या कारखान्यांबरोबर भाजपच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.


*या कारखान्यांना महाविकासआघाडी सरकारची हमी *


- भाजपच्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना


- भाजपचे रावसाहेब दानवे यांचा श्री रामेश्वर सह. साखर कारखाना


- भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखाना


- भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा निराभिमा सह. साखर कारखाना


- भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील यांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सह. साखर कारखाना


- काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण सह. साखर कारखाना

- राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा सुंदरराव सोळंके सह. साखर कारखाना


- राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांचा जय भवानी सह. साखर कारखाना


- काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना



- राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत भालके यांचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना 


-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार