MB NEWS:परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती

 परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरासह महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने वैद्यनाथाच्या पायर्‍यावर घंटानाद आंदोलन करुन आरती करण्यात आली.

महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी भाजपाच्यावतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. परळी भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथाच्या उत्तरघाटावरील पायर्‍यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी दार घड उध्दवा ! दार उघड, मंदिरा चालू, मंदिर बंद उध्दवा तुझा कारभाच धुंद अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळी 11 वाजता करण्यात आलेले हे आंदोलन वैद्यनाथाच्या आरतीने समाप्त झाले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, डॉ. शालिनीताई कराड, निळकंट चाटे,उत्तम माने,राजेश गित्ते, सौ.सारिका कुरील, राजेंद्र ओझा, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, रवि कांदे , सुरेश माने,नरसिंग सिरसाट, किशोर केंद्रे, नरेश पिंपळे, उमेश खाडे, चंद्रकांत देवकते,भरत सोनवणे, नितीन समशेट्टी, अश्विन मोगरकर, योगेश पांडकर, गोपी कांगणे, राम गित्ते, गोविंद मोहेकर, बंडू कोरे, विजय दहिवाळ, शाम गडेकर, अभिजीत गुट्टे, संजय मुंडे, नितीन ढाकणे, भुराज बदने, किशोर गीते,सुशिल हरंगुळे, राजेंद्र दरगुंडे, विजय खसे, नितीन मुंडे, धनराज कुरील, गोविंद मोहेकर,किरण दौड हे उपस्थित होते. आंदोलनानंतर भाजपा पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्यांचे तहसिलदार यांना निवेदन दिले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !