इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणी पुण्यातून आरोपी जेरबंद; एका महिलेसह तीन अटक*

 


परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणी पुण्यातून आरोपी जेरबंद; एका महिलेसह  तीन  अटक*

_खळबळ उडवणारा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत होता कैद

 

परळी वैजनाथ..... परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील   सोने-चांदीच्या दुकानी हातचलाखी करून दोन लाखांचे सोने लंपास केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता आणि ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी परळी पोलिसांनी पुण्यातून आरोपी जेरबंद केले आहेत.एका महिलेसह  तीन जणांना ताब्यात घेतले आहे. परळी पोलिसांचे तपासातील हे मोठं यश आहे.

         राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात अरुण टाक यांचे गेली अनेक वर्षांपासूनचे जुने अरुण टाक अँड सन्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. या दुकानी भरदिवसा म्हणजे अंदाजे बारा ते साडेबारा दरम्यान काही अज्ञात महिला तोंडास स्कार्फ बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. बघता बघता डोळ्यात धूळ फेकत दोन गंठण व एक नथनीचा सेट हातचलाखी करून लांबवले. परळी शहरात सलग दोन दिवस बाजारपेठेत चोरीचे प्रकार घडले. याबाबत 'परळीत महिला चोरट्यांची टोळी सक्रिय' या मथळ्याखाली MB NEWS न्युज ने बातमी दाखवली होती. खळबळ उडवणारा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत  कैद होता.

          या संदर्भाने परळी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पुण्यातून तीन जणांना उचलले आहे.या चोरीच्या घटना चा तपास करुन  सक्रिय झालेल्यामहिला चोरट्यांची टोळी चा पर्दाफाश करण्याचे आव्हान निर्माण झाले. या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातून  एक मारुती कार, दोन पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास परळी पोलीस करत असुन चोरी करणारी मोठी टोळी उघड होण्याची शक्यता असुन विविध चोरीच्या घटनांमध्येही या टोळीचा हात आहे का हेही स्पष्ट होणार आहे.

            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!