MB NEWS:मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर* *२३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया -डाॅ.उषा बांगर*

 *मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर* 

*२३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया -डाॅ.उषा बांगर*



धारुर प्रतिनिधी


धारुर तालुक्यातील मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी तेवीस महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आरोग्य प्रशासनाने या प्रसंगी घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ उषा बांगर यांनी दिली आहे. 

   मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आसरडोह, उपकेंद्र हिंगणी, उपकेंद्र कान्नापुर,उपकेंद्र तेलगांव,उपकेंद्र भोपा अंतर्गत ४० ते ४५ गावातील गरजवंत महिलांवर आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या ४ महिन्यांत १३० महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांत आयोजित शिबीरात २३ महिलांवर कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बीड येथील स्रीरोग तज्ञ डाॅ. अशोक मुंडे यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असुन बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ उषा बांगर सह आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी शस्त्रक्रिया शिबीरात परिश्रम घेत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी राबविले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार