MB NEWS:फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत परळी शाखेच्यावतीने डाॅ. दाभोळकरांना अभिवादन!

 

फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे  दाभोळकर म्हणत परळी शाखेच्यावतीने डाॅ. दाभोळकरांना अभिवादन! 



परळी (प्रतिनिधी) फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत परळी मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना परळी शाखेच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरी डाॅ. नरेंद्र दाभोळकरांचे अनुयायी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने  सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली करत या संदर्भात परळी शाखेच्या वतीने  ई-मेल द्वारे  पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे.



यावेळी उपस्थित आणि शाखाध्यक्ष जी.एस सौदळे, शाखा उपाध्यक्ष प्रा. दास वाघमारे, जिल्हा कार्यकारणी वरील प्रा. विलास रोडे यांनी दाभोळकर यांच्या कार्यावर ती प्रकाश टाकतात आपले मनोगत व्यक्त केले. ते २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आज या घटनेला सात वर्ष पूर्ण होत आहेत. आधी या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांनी केला. मात्र, आरोपी सापडत नसल्यामुळे गुन्ह्याचा तपास कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे देण्यात आला. परंतु सात वर्षे पूर्ण होऊनही सीबीआयला खुनाच्या मास्टरमाईंडला शोधण्यात यश येत नसल्याने तपासावर नाराजी व्यक्त करत  सीबीआयने लवकरात लवकर मुख्य आरोपीला पकडावं


  फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत आज सुद्धा 

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते  हे काम निष्ठेने व जोमाने पुढे नेत आहेत. रिंगण नाट्य, मानस मैत्री, जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या निर्मितीचा लढा, अशा अनेक आंदोलनांनी माणूस मारुन विचार संपत नाही दाभोळकरांचे विचार आज समाजात पुढे जाताना दिसत आहेत. असेही ते म्हणाले. 


यावेळी उपस्थितअंनिस शाखा अध्यक्ष जी.एस. सौंदळे, शाखा उपाध्यक्ष प्रा.दासु वाघमारे जिल्हा कार्यकारणी वरील, प्रा.विलास रोडे, प्रधान सचिव विकास वाघमारे, प्रकाशन वितरण राहुल घोबाळे,युवा पत्रकार आकाश सावंत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !