केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
BREAKING NEWS: राडा ;एक ठार
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
परळीतील बहुचर्चित व्यापारी अपहरण प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह परळी पोलिसांनी पकडले- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा..... परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमाला सह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन दिली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, एक रिवाल्वर सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की, पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126 (2),140(2),308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन. एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी बे.ता. परळी जि. बीड, यांनी फिर्याद द...
परळी- नंदागौळ रस्त्यावर आढळला मृतदेह परळी वैजनाथ ,प्रतिनिधी परळी - नंदागौळ रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ३५-४० असलेल्या इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. तो वेडसर असून मागील काही दिवसापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात फिरत होता. तरी त्याचेबाबत अगर नातेवाईकबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
न.प. परळी वैजनाथ: जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण व शासकीय कामात अडथळा आणला; माजी नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी नगर परिषद कार्यालयात घरकुल विभागातील एक करमचारी शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. या कर्मचाऱ्यांस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद या न प कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, न प कर्मचारी फिर्यादी सिद्धार्थ भारत गायकवाड वय 30 वर्ष, व्यवसाय- नौकरी (MIS स्पेशालीस्ट) नगर परीषद परळी हे शासकीय कामकाज करित असताना यातील आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस कामकाजा बाबत विचारणा केली व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताबुक्काने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन आरोपी- 1) अन्वर मीश्कीन शेख 2) शेख अजीज इस्माईल 3) शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुरन - 194/2024 कलम 132,121 (1), 352, 351 (2),351(3),...
● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार
परळी विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार मैदानात: निवडणुकीत दोन राजेसाहेब देशमुख परळी वैजनाथ, प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारी अर्जांपैकी केवळ अकरा अर्जाच शिल्लक राहिले आहेत. प्रबळ दावेदार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट होणार आहे. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वै ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता ...
नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार
धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत यंदा 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, हेमा मालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी परळी वैद्यनाथ (दि. 04) - राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्रभर ख्याती असलेला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी 19 व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात मी त्या शनिवारपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी (ता.07) रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्व.पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सु...
आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू केज :- केज तालुक्यातील बहुचर्चित आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला आहे.मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले.केज पोलिसांनी हा मृतदेह पीएम करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.
MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !
परळी वैजनाथ- नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघात: वसंतनगरचा युवक गंभीर जखमी दुचाकी व एसटी बसमडध्ये धडक; अपघातात पाय निघाला बाजूला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा... परळी ते नंदागौळ रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत अनिल प्रेमदास राठोड (वय 27, रा. वसंतनगर, परळी) या युवकाचा पाय बाजूला निघून गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी दूर फेकली गेली आणि राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पाय शरीरापासून वेगळा झाला असून त्यांना अतिशय वेदनादायक अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मदतीसाठी पुढे सरसावले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
परळीत गळफास लावून एका युवकाची आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... आनंदनगर, पद्मावतीगल्ली भागात संत नरहरी महाराज मंदिर परिसरातील रहिवासी एका युवकाने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा.घडली आहे.याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा. सुमारास मयत युवकाने घरातीलच लोखंडी हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.मनोज मारोती काळे वय ४१ वर्षे असे मयताचे नाव आहे.दारुच्या नशेत त्याने ही आत्महत्या केली असल्याचे कारण पोलिसात दिलेल्या प्रथम खबरीत देण्यात आलेले आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सफौ सौंदनकर हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा