MB NEWS: परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट*

 *परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट*


*अँटिजेन टेस्टसाठी मुबलक किट्स उपलब्ध, सरसकट व्यापारी बांधवांनी टेस्ट करून घ्याव्यात - धनंजय मुंडेंचे आवाहन*


परळी (दि. १८) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी शहरात व्यापारी वर्गाच्या सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट केंद्रांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी दररोज ३००० टेस्ट पूर्ण होतील अशी दक्षता घेण्याच्या सूचना ना. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या टेस्टसाठी आरोग्य विभागाकडे मुबलक प्रमाणात किट्स उपलब्ध असून सरसकट व्यापाऱ्यांनी या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहन धनंजय मुंडे यांनी व्यापारी बांधवाना केले आहे.


यावेळी ना. मुंडे यांच्यासह न. प. चे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदुलाला बियाणी, राजा खान, भाऊड्या कराड, बाळू लड्डा, रवी मुळे, विजय भोयटे, सुरेश टाक, नितीन कुलकर्णी, शंकर आडेपवार, अनंत इंगळे, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,  तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरमे, डॉ. मोरे, डॉ. चाटे, नायब तहसिलदार रुपनर, चेतन सौंदळे, संग्राम गित्ते, गिरीश भोसले, मोहन साखरे, भागवत गित्ते यांसह परळीतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोरोनाची मास स्प्रेडिंग थांबवून जिल्ह्यात वाढत चाललेल्या साखळीला अंकुश लावण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापारी व अन्य मास स्प्रेडिंग घटकांच्या अँटिजेन रॅपिड टेस्टिंग केल्या जात आहेत. परळी शहरातील चार केंद्रांवर या टेस्ट केल्या जात असून याठिकाणी व्यापारी वर्गाने उत्सुर्फतपणे टेस्टसाठी सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. 


या टेस्ट साठी जिल्हा आरोग्य विभागाला एक लाख किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून परळी शहरात दररोज तीन हजार व्यापाऱ्यांच्या तपासण्या केल्या जाव्यात अशा सूचना यावेळी ना. मुंडे यांनी केल्या. अँटिजेन टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या मास स्प्रेडिंगला ब्रेक लागणार असुन यासाठी सरसकट व्यापारी बांधवांनी तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी ना. मुंडे म्हणाले.


ना. धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथ राव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी बसस्थानक येथे सुरू असलेल्या केंद्रांवर भेटी दिल्या. दुपारपर्यंत ५०० हुन अधिक व्यापाऱ्यांची तपासणी पूर्ण झाली असून आतापर्यंत १६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !