MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी 'श्री ' चे उत्साहात आगमन* *जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना

 

*पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी 'श्री ' चे उत्साहात आगमन*


*जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना !*


मुंबई दि. २२ -------  पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज  श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजाताई मुंडे व त्यांचे पती डाॅ. अमित पालवे यांनी 'श्रीं ' ची यथोचित पूजा करून करून आशीर्वाद घेतले. देशातील व महाराष्ट्रातील जनतेवर आलेले कोरोना महामारीचे विघ्न दूर कर अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.


   प्रतिवर्षी परंपरे प्रमाणे यंदाही  पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी सकाळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे व त्यांचे चिरंजीव आर्यमान पालवे यांनी गणरायाची यथासांग पूजा केली. गणपतीची अतिशय देखणी व सुबक अशी मुर्ती आणि त्यासमोर मांडलेली विविध प्रकारच्या फुलांची आरास यामुळे वातावरण यावेळी अगदी भक्तीमय झाले होते. 


  सध्या कोरोना महामारीचे संकट देशावर आणि राज्यांवर आहे, या संकटात गणपती बाप्पांनी संकटमोचक बनून हे विघ्न दूर करावे अशी प्रार्थना करत पंकजाताई मुंडे यांनी

कोरोना मुक्त देश, कोरोना मुक्त महाराष्ट्र तसेच देशाच्या उज्वल भविष्याची कामना यावेळी गणरायाकडे केली.

•••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार