इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

 *कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)

        कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आपल्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अ‍ॅन्टीजेन टेस्ट महत्वाची असल्याने व्यापारी व नागरिकांनी आपापली अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी व कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांनी निर्धार करावाअसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

          जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा रुग्ण तातडीने तपासला जावा या दृष्टीकोनातून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात दि. १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव येथे व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट होणार आहे. या पार्श्वभुमीवर परळीसह ४ ठिकाणी उद्यापासून अ‍ॅन्टीजेन टेस्ट होत आहेत. व्यापारी बांधवांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक आहे.शहरात विविध ठिकाणी टेस्ट सेंटर तयार करण्यात आली असून विभागानुसार कोणत्या व्यापार्‍यांनी कोणत्या केंद्रावर अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी स्वॅब द्यायचा आहे त्याची निश्चिती करण्यात आलेली आहे. 

             कन्टेटमेन्ट भागातील नागरिकांना टेस्टसाठी ३ दिवस मिळणार असून त्यांनाही विविध ठिकाणी सेंटर उभारण्यात आलेले आहेत.व्यापारी व नागरिकांनी आपापली अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी व कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांनी निर्धार करावा.आपण व आपल्या कुटूंबीयांच्या कोरोना सुरक्षेसाठी अ‍ॅन्टीजेन टेस्ट उपयुक्त असल्याने व्यापारी व नागरिकांनी आपापली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!