MB NEWS: *विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महंत सुधीर दास यांची निवड ; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव*


 *विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महंत सुधीर दास यांची निवड ; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव*



नाशिक - जगभरात कार्यरत असणाऱ्या विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीमहंत सुधीरदास पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून  विविध वाहिन्यांवर म्हणून प्रभावी बाजू मांडत असतात.तसेच कुंभ पर्वात अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या निर्मोही आखाड्याचे महंत अशीही त्यांची सर्वदुर ओळख आहे.


नाशिक येथील काळाराम मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी घराण्याचे २७ वे वंशज म्हणून त्यांची ख्याती आहे.श्रीमहंत यांनी कला क्षेत्रात सर्पूंण शुक्ल यजुर्वेद या विषयात पदव्युत्तर अध्ययन केले असून ते श्रौत स्मार्त संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक आहेत.या निवडीबद्दल संघटनेचे आंतरराष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष योगी श्री आदित्यनाथजी महाराज(मुख्यमंत्री,उत्तरप्रदेश) यांच्याकडून अभिनंदन केले गेले आहे.अशी माहिती संघटनेचे आर बी मल्ल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.दरम्यान विश्वहिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी पुजारी यांची निवड झाल्याने देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.नाशिक लोकसभेची निवडणूकही श्रीमहंतांनी लढवीलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !