MB NEWS:दिलेल्या वेळेत स्वॕब देण्यास हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे; तपासणीस नकार दिल्यास त्यांच्यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई

दिलेल्या वेळेत स्वॕब देण्यास हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे; तपासणीस नकार दिल्यास त्यांच्यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई 

बीड ः
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॕब तपासण्यात येतात परंतु काही महाभाग स्वॕब देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करत असल्याचे अनुभव सातत्याने येत असल्याने अशा व्यक्तीवर कायदेशीर बडगा उगारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आता स्वॕब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी दिला आहे.

बीड कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनामार्फत प्रसार थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून बाधित रुग्णाच्या घनिष्ठ संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन विलगीकरण करून आवश्‍यकतेनुसार त्यांची कोरोणा तपासणी केली जाते यासाठी त्या व्यक्तींना आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क करून जवळच्या करून कोवीड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी वेळ व दिनांक निश्चित केला जातो मात्र काही व्यक्ती विविध कारणे देऊन स्वॕब देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करतात, दिशाभूल करणे चुकीचा पत्ता देणे ,फोन बंद करून ठेवणे तसेच कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे आर्वच्यच भाषेत बोलणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यास बाधा येत आहे अशा महाभागावर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी यापुढे कोणत्याही कारणास्तव स्वॕब देण्यास टाळाटाळ करू नये दिलेल्या वेळेत स्वॕब देण्यास हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे तपासणीस नकार दिल्यास त्यांच्यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार