इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचं निधन

 *⭕माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचं निधन




           नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन त्यांचं निधन झालं आहे. प्रणब मुखर्जी यांचे पूत्र अभिजीत बॅनर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते.

   प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

      प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब असल्यामुळे 10 ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या