MB NEWS:कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

 कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून

 - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

 


अंबाजोगाई, प्रतिनिधी

कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून विवाहितेचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणात सासऱ्याचा हात असल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला आहे.

 शीतल अजय लव्हारे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या गळ्यावर कु-हाडीने वार करण्यात आले असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित सासरा फरार झाला असून बर्दापूर पोलिसांचे पथक रात्रीपासून त्याचा कसून शोध घेत आहेत. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

 

*प्रेमविवाह केल्याच राग ?*

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय लव्हारे याने पाच वर्षापूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना चार वर्षाची एक मुलगी देखील आहे. आपला विरोध झुगारून अजयने विवाह केल्याचा राग वडीलास होता.याच रागातून त्याने हे कृत्य केले असावा असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

लग्नापासून अजय बाहेरगावी राहत होता. लॉकडाऊन नंतर तो गावाकडे परतला होता. अशी प्राथमिक माहिती आहे.पोलीस तपासानंतरच खरे कारण उघड होऊ शकणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार