MB NEWS:पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा* *_जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांचे आवाहन_*

 पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा*


*_जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांचे आवाहन_*



परळी । प्रतिनिधी


कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनलोड मुळे हातावर पोट भरण्यासाठी रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणारे खुपच अडचणीत सापडले आहेत. आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार कर्ज स्वरूपात अर्थिक मदत देण्यात येणार आहे . केंद्र सरकारने (एमएसएमई) सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील व्यवसायीकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने स्वनिधी योजना जिल्ह्यातील सर्व शहरातील नगर परिषद, नगरपंचायत मार्फत सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व शहरांत असणाऱ्या पात्र छोट्या व्यवसायीकांनी Www.Pmsvanidhi.Mohua.Gov.In या संकेतस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील विविध शहरातील रस्त्यावर व रस्त्या लगत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाले, आणि छोटे दुकानदारांना शासनामार्फत कर्ज देणार असल्याने त्याच्या मदतीने लघु व्यवसायिक आपले कामकाज परत चालू करू शकतील. या योजनेतून १० हजार रुपयांचे मुदत कर्ज देण्यात येत आहे. हे कर्ज घेण्यासाठी कोणतेही तारण देण्याची गरज लागणार नाही. फळे- भाजीपाला, लॉण्ड्री, केसकर्तनालये, पान दुकाने आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. फारच सोप्या अटींवर हे कर्ज दिले जाणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत “पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा हजारो पथविक्रेत्यांना फायदा होणार आहे. शहरात रस्त्यावर दुकाने लावणाऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची योजना असून याचा फायदा घेत दुकानदार आपला व्यवसाय परत सुरू करू शकतील. या योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना व्याजात ७ टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे पात्र लाभार्थी मोबाईल अँप आणि वेब पोर्टलवरून यासाठी अर्ज करु शकता. काही मोजक्या नियमांची पूर्तता करून जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, जास्तीत जास्त पथविक्रत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा परळी नगर परिषदेचे नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.


*परळीच्या पथविक्रेत्यांनी अर्ज करावेत*

“पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना” ही सर्व नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रांत लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या पथविक्रेत्यांना १० हजार रूपयांचे खेळते भांडवल मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने व्यवसायची सुरूवात करण्यास याची मदत होईल. परळी शहरातील शेकडो पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांची व्यवसायीक हानी झाली होती. परळी शहरातील शेकडो पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी परळी शहरातील पथविक्रेत्यांनी श्री.सतीश घोबाळे 9420110179 व मिना नेहरकर 9637533075 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार