MB NEWS:परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम: सात हजार नागरिकांची होणार टेस्ट ; पहिल्या टप्प्यात सुखावह अहवाल*

 

*परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम: सात हजार नागरिकांची होणार टेस्ट ; पहिल्या टप्प्यात सुखावह अहवाल*



 

परळी वैजनाथ /प्रतिनिधी

        परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट होत आहे.यामध्ये सात हजार नागरिकांची  टेस्ट होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ -२५ चे गट पाडले असुन त्यानुसार टेस्ट होत आहेत. पहिल्या टप्प्यात चारही केंद्रांवर सुखावह अहवाल आले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अधिकृत अहवाल प्रशासनाच्या वतीने. काही वेळातच जाहीर होणार आहेत.



         परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट घेण्यासाठी चार  केंद्रावर आरोग्य प्रशासनाची टिम सज्ज झाली आहे.परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम सुरू झाली असुन व्यापारी व नागरीकांचा स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.टेस्टनंतर प्रत्येकाला १५ते २० मिनिटांत रिपोर्ट कळणार आहे.

       परळी शहरात कार्यान्वित केलेल्या चार अॕन्टीजन टेस्ट बुथचे नोडल आफिसर म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ दिलिप गायकवाड काम पाहात आहेत व या चार बुथच्या प्रत्येक बुथवर एक डॉक्टर,दोन टेक्निशन,एक वार्ड बाॕय,चार शिक्षक ,चार डाटा आॕफरेटर,दोन पोलिस कर्मचारी,एक वाहन,एक फिरते वाहन,दोन अंबुलन्स,दोन स्कुल बस अदी यंञणा बुथ निहाय सज्ज झाली आहे.

अॕन्टीजन तपासणी करुन घेत असलेल्या नागरिकांना अवघ्या 15 मिनिटांत आपला रिपोर्ट तपासणी केलेल्या बुथवर मिळणार आहे.

     लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर,श्री सरस्वती विद्यालय,बस स्थानक व सावतामाळी मंदीर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अॕन्टीजन टेस्ट बुथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या वेळेत व नियोजित केलेल्या प्रोग्राम नुसार आपली अॕन्टीजन टेस्ट करुन घ्यावी असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !