MB NEWS:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा खा.प्रितमताईनी घेतला आॅनलाईन आढावा

 


राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा खा.प्रितमताईनी घेतला आॅनलाईन आढावा


*जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्सची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना*

परळी.दि.२६----कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मंगळवारी ( दि.२५ ) राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ऑनलाइन आढावा बैठक घेतली.जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेताना त्यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिल्या.

कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.या निधीचा योग्य व्यय होता आहे का याची माहिती घेऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी परीक्षांची वाट न बघता कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सना सेवेत रुजू करून घेण्याची सूचना त्यांनी केली.

तसेच प्रशासन व आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टर्स व रुग्णालयांचे सहकार्य मिळवण्यासाठी खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण न करता त्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन तज्ञ सेवा घेण्याचा विचार मांडला.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभाग व कोविड योद्धयांच्या कामाचे कौतुक केले.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !