MB NEWS: प्रासंगिक/ केशव बडवे - *' गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला… '*

 *' गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला… '*


*अगदी सध्या व शांत वातावरणात या वेळेसचा गणेशोत्सव पार पडला आहे. दरवर्षी बाप्पाचं आगमन होणार म्हटलं की एकदम जल्लोषाच, आनंदी व भक्तिमय वातावरण सगळीकडे पसरलेलं असतं परंतु या वर्षीचा उत्सव हा थोडा वेगळाच झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बापाचं आगमन हे अगदी साध्या पद्धतीने झालं व विसर्जन सुद्धा त्याचप्रमाणे होईल.सध्याची परिस्थिती पाहता आता आपण आपली स्वतःची काळजी घेणं ही खुप महत्वाची बाब आहे. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे बाप्पाची मनोभावी पुजा करतात बाप्पाला आवडणारे मोदक, लाडू इ. प्रकारची नैवेद्य तयार करतात. वर्षातील हा एकमेव सण असेल ज्यात हे १० दिवस कसे जातात हे काही कळतच नाही. अनेक नावांनी बाप्पाला बोलावलं जातं कारण गणतपी हा सर्व विश्वाचं आद्य दैवत आहे.बाप्पाच्या मूर्तीला पाहुन मन एकाग्र झालेलं असतं व आपल्या सर्व चिंता व दुःख विसरून जाऊन आपण बाप्पाची सेवा करत असतो. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजाअर्चा केल्यानंतर आता त्याला स्वगृही पाठवताना अनेकांचे डोळे पाणावलेले असतील.आपल्या बाप्पाची पाठमोरी रेखीव मूर्ती मनात साठवत प्रत्येकानं बाप्पाकडे निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी ! अशी आर्त हाक दिली.*

*गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.! 'जयघोषात पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत बाप्पाला आनंदमय वातावरणात निरोप द्यावा..*

*संपूर्ण विश्वावर आलेलं कोरोना महामारीचं भयंकर व मोठं संकट लवकर टळू दे एवढंच मागणं विघनहर्त्या तुझ्या चरणी..!*     


केशव प्रदिपराव बडवे*                        

परळी वैजनाथ*



 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार