इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात असणार मुसळधार पाऊस आणि कडाक्याची थंडी !*

 *सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात असणार मुसळधार पाऊस आणि कडाक्याची थंडी !*

जगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट समोर आलं आहे. प्रशांत महासागरात ला-निना वादळाचा प्रभाव दिसून येत असल्यानं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणि कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात 2020 च्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भारतात ला निनाचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांत सगळ्यात जास्त दिसून येण्याची शक्यता आहे.

ब्रिटीश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 1994 पासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एकूण 28 लाख कोटी टन बर्फ वितळला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, आणि वितळणाऱ्या बर्फामुळे जमीन आणि समुद्रातील तापमानावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!