MB NEWS:पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री*

 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

--------------------------------- 

*🔷पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री*

----------------------------------- 


◼️मुंबई, 17 सप्टेंबर: राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती ( Maharashtra police bharti 2020) करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची  माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.  सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे.


राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती लवकरच केली जाणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी या भरतीचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.


महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे, अशा शब्दांत राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरू आहे आणि यात राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे, असा सवाल खासदार संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार