इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:परळी शहरातील 16 प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती केंद्राद्वारे केले संकलन-सभापती किशोर पारधे

 *शहरातील सार्वजनिक व घरातील श्री चे न.प.च्या वतिने विसर्जन*


*परळी शहरातील 16  प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती केंद्राद्वारे केले संकलन-सभापती किशोर पारधे



परळी (प्रतिनीधी)

 परळी शहरात स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक प्रभाग निहाय असे 16 श्री गणेश मुर्ती संकलन केंद्रात सार्वजनिक व घरोघरी स्थापन केलेल्या श्री गणेशाचे  न.प.च्या वतिने संकलन करण्यात आले व प्रभु वैद्यनाथ मंदीर परिसरात असलेल्या हरि हर तिर्थात बप्पांचे प्रशासनाच्या वतिने विसर्जन  आज करण्यात आले.

  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे,व न.पचे गटनेते वाल्मीक (आण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या नियोजनात न.प.अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व स. सभापती, सर्व स. सदस्य / सदस्या यांच्या सहकार्याने स्वच्छता, आरोग्य व वैद्यक सभापती  किशोर पारधे यांनी परळी शहरामध्ये गणेश मंडळामार्फत स्थापन करण्यात आलेली श्रीगणेश मुर्ती तसेच नागरीकांनी त्यांच्या घरी स्थापन केलेल्या श्रीगणेश मुर्ती संकलीत करण्याकरीता शहरात प्रभाग निहाय 16 श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते.

      मागील दहा दिवसापासुन कोरोना मुळे साधेपणाने साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज दि.1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी झाली.जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार परळी न.प.च्या वतिने थर्मल कॉलनी मुख्य गेट,संत नरहरी महाराज मंदिर,विद्युत डी.पी.जवळ,कृष्णाबाई देशमुख शाळेसमोर, गणेश मंदिर जवळ गणेशपार,सावता माळी मंदिर,हनुमान मंदिर जवळ पद्मावती गल्ली,सुभाष चौक,एस.के.हाॕटेल,बेग टाइल्स उड्डाणपुलाशेजारी,शिवाजी चौक, गजानन महाराज मंदिर,हनुमान मंदिर मोंढा मार्केट,जगमित्र नागा मंदिर,देशमुखपार, हनुमान नगर चौक चांदापूर रोड,पंचायत समिती नजीक अशा सोळा केंद्रावरून गणेश मुर्ती संकलित करण्यात आल्या.तर न.प.कार्यालयात बसविण्यात आलेल्या गणपती चे विसर्जन नायब तहसिलदार बाबुराव रूपनर,स्वच्छता सभापती  किशोर पारधे, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,तलाठी  राजुरे,शंकर साळवे , दिलीप रोडे,दिलीप गुट्टे व नगर परिषद कर्मचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

----------

परळी नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतिने बप्पांच्या विसर्जनासाठी शहरात 16 श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली होती.नप.च्या या आवाहनाला  परळीकर गणेश भक्तांनी मोठा प्रतिसाददेत श्रींच्या मुर्ती मनोभावे संकलन केंद्रात दिल्या त्या बदल परळीकरांचे आभार स्वच्छता सभापती किशोर पारधे यांनी मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या