परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
व्याजदाराचे अमिष दाखवून एक कोटी 28 लाखांची फसवणूक; तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
औरंगाबाद येथील अरुण हरीहर मुळे यांना परळी शहरातील एका पतसंस्थेने ज्यादा व्याजदाराचे अमिष दाखवुन ठेवीच्या रक्कमा मुदत संपुनही परत न देता 1,28,66,699 रु.चा अपहार केल्याची घटना घडली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नामांकित मल्टीस्टेट क्रेडीट कॉ.ऑप सोसायटीने संगणमत करुन तक्रारदार व इतर ठेवीदार यांना ज्यादा व्याजदाराचे अमिष दाखवुन ठेवीच्या रक्कमा मुदत संपुनही परत न देता 1, 28,66, 699 रुपंयाचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अरुण हरीहर मुळे यांच्या फिर्यादीवरुन औम नारायण जैस्वाल, संगिता ओम नारायण जैस्वाल रा.परळी वैजनाथ, विष्णु रामचंद्र भगवत रा.नाशिक यांच्या विरुध्द दि.11 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता गुरन 273/2020 कलम 420, 406, 409, 34 भादवी सह कलम 3 महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय अस्थापना मधील) हीतसंबंधाचे संरक्षण कारणे बाबत अधिनीयम 1999 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा बीडचे पो.नी.वाघ हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा