इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग

----------------------------------- 

*◼️औरंगाबाद जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस, ग्रामीण भागात उडाली दाणादाण*

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

*जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग*

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

*माजलगाव धरण 100 टक्के भरले*

----------------------------------- 



औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक लहान नद्यांना, ओढ्यांना पूर आला तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. कन्नड तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पावसाने कहर केला.  अनेक ठिकाणी पाणी शेतात साचले तर गावात देखील पाणी शिरले.



*जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग*


औरंगाबाद पैठण जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांपैकी काही दरवाजे दीड फूट काही दोन फूट तर काही दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी पात्रानजीक राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच नदीपात्रामध्ये मालमत्ता, चीज वस्तु, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती अवजारे इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


*माजलगाव धरण 100 टक्के भरले*


जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यामुळे व कुंडलिका, बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण 100 टक्के भरले असून प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र आता अकरा दरवाजे उघडण्यात आलेत.

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात 94 हजार 320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.


सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. याबाबत सर्व नदी लगतच्या गावांमध्ये संबधीत ग्रामयंत्रणेमार्फत अवगत करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!