MB NEWS: *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*

 *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*



नवी दिल्ली :  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'NEET' तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'JEE' परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.४) नकार दिला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. JEE परीक्षेचे चार दिवसांचे पेपर संपले असून येत्या ६ तारखेपर्यंत ही परीक्षा होणार आहे.


कोरोना संसर्गामुळे JEE व NEET परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी विनंती करीत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिकाही फेटाळली गेल्याने JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला.


गैर भाजपशासित सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या मंत्र्यामध्ये महाराष्ट्राचे उदय सामंत, प. बंगालचे मोलाय घताक, झारखंडचे रामेश्वर ओरान, राजस्थानचे रघु शर्मा, छत्तीसगडचे अमरजित भगत आणि पंजाबचे बी. एस. सिद्धू यांचा समावेश होता. या सर्वांची पुनर्विचार याचिका न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !