MB NEWS:31 डिसेंबरला 3 वर्षे पूर्ण झालेल्या बालकास नर्सरी, 6 वर्षे झालेल्यास पहिलीत प्रवेश

 31 डिसेंबरला 3 वर्षे पूर्ण झालेल्या बालकास नर्सरी, 6 वर्षे झालेल्यास पहिलीत प्रवेश



मुंबई

इयत्ता पहिली प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट असली तरी ही अट गेल्यावर्षी 15 दिवसांनी कमी करत मानिव दिनांकानुसार 15 नोव्हेंबरपर्यंत केला होता. याबाबतही तक्रारी केल्यानंतर आता 31 डिसेंबरला ज्या बालकांचे वय 3 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल तरच प्ले ग्रुपमध्ये प्रवेश मिळणार आहे. याच तारखेला 6 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्यास पहिलीला प्रवेश मिळणार आहे. ही अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केला आहे.

आरटीई निकषानुसार इयत्ता पहिलीत किती वर्षाच्या मुलांना प्रवेश द्यावा याबाबतचे निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या टप्प्यांत जाहीर झाले आहेत. टप्प्याटप्प्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आला. दहा वर्षांपूर्वी पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित करताना मुलांचे 31 जुलैपर्यंतचे वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे यानंतर जन्माला आलेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंतचे वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे नुकसान होत असल्याचा आरोप झाला. आता ही अट पुन्हा बदल करीत यंदा शैक्षणिक वर्षांपासून (2020-21) मुलांच्या वयासाठी 15 नोव्हेंबर ही केली होती. पहिलीच्या प्रवेशाचा गोंधळ सुरू आहेत. मुख्याध्यापक हे वय कमी असल्याचे सांगत पहिलीला प्रवेश देत नाहीत. आणि सीनियर केजीमध्ये परत बसवा असे सांगतात, त्यामुळे यावर आता तोडगा काढत शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक संचालनालयाच्या सूचनेनुसार यंदा नव्याने तारीख जाहीर करत जीआर काढला आहे.

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 31 डिसेंबरपर्यंत पहिलीसाठी 6 वर्षं तर प्ले ग्रुप/नर्सरीसाठी 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे., 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार असून  शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्यासाठी मानिव दिनांक 31 डिसेंबर ठरवला आहे. या तारखेला विद्यार्थ्याचे वय पहिली वर्गासाठी किमान 6 वर्षे व प्ले ग्रुप / नर्सरीसाठी किमान 3 वर्षे असावे लागणार आहे. म्हणजेच प्रवेश घेताना 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्याचे वय पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण व नर्सरी / प्ले ग्रुपसाठी 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे. याआधी 30 सप्टेंबर ही मानिव दिनांक गृहीत धरली जात असताना बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. ही तारीख आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेशासाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार