MB NEWS:प्रधानमंत्री पथविक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा योजना


                     

प्रधानमंत्री पथविक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा योजना



बीड, दि,2:- (जि.मा.का.)  लॉकडाऊनमध्ये शहरातील मोडकळीस आलेल्या छोटया व्यवसायिक पथविक्रेत्यानां त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथ विक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना सुरु केली  असून  बीड शहरातील पात्र पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 

        पथविक्रेत्यांना 10  हजार रुपयापर्यंत खेळते भांडवली कर्ज बँकामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ही योजना दि. 24 मार्च 2020 रोजी  व त्यापूर्वी शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांना लागू  आहे. पथविक्रते 1 वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपये पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.  हे कर्ज विनातारण असून विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पथविक्रते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. व्याजदर बँकाच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे लागू राहील. या योजनेतंर्गत विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास 7 टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात तिमाहीप्रमाणे जमा केले जाईल. 

       या योजनेमध्ये डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजीटल माध्यमातून व्यवहार करणा-या विक्रेत्यांना कॅश बँकाची सुविधा देण्यात येत आहे. यासाठी मोबाईलला लिंक आधारकार्ड, बँकांना लिंक असलेला मोबाईल नंबर, रेशनकार्ड,बँकेचे पासबुक, मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. 

              योजनेचा लाभ घेण्यासाठी महाईसेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र तथा इतर स्वरुपात ऑनलाईन अर्ज  pmsvanidhi.mohua.gov.in  या संकेत स्थळावर भरणे आवश्यक आहे. बीड शहरातील पात्र पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा .                                                            ******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार