MB NEWS:राज्यव्यापी आंदोलनात परळीतील अभियंत्यांचा सहभाग; द्वारसभेने मांडलं आपलं म्हणणं !


 राज्यव्यापी आंदोलनात परळीतील अभियंत्यांचा सहभाग; द्वारसभेने मांडलं आपलं म्हणणं !



परळी वैजनाथ दि.24-

         सबॅार्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला.या आंदोलनात अऊदा, मंडल, परळी येथील अभियंतेही सहभागी झाले.
      एसईएचे राज्यव्यापी आंदोलन व अधिक्षक अभियंता अऊदा मंडल यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने पुकारलेल्या आंदोलनात महापारेषणच्या अभियंत्यांनी येथील अऊदा मंडल येथे द्वारसभा घेतली. या द्वारसभेस परळी, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथील एसईएचे अभियंते बहुसंख्येने उपस्थित होते.या द्वारसभेस औरंगाबाद परिमंडलातील एसईएचे सहसचिव माधव चिलके, रघुनंदन कुलकर्णी, स्वप्निल पाठक यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन अतिशय शांततापूर्ण पद्धतीने व कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून सुरू असताना अधिक्षक अभियंता, अऊदा मंडल यांनी एसईएच्या पदाधिका-यांना चर्चेसाठी न बोलवता स्थानिक पोलीसांना बोलावून या आंदोलनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 
आपल्याच अभियंत्यांनी पुकारलेल्या आंदोलनात अधिक्षक अभियंता अऊदा मंडल पोलीस बळाचा वापर केल्याने उपस्थित अभियंते व पदाधिकारी यांनी अधिक्षक अभियंता अऊदा मंडल यांचा तीव्र शब्दात निषेध केला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार