MB NEWS:*राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनाने समाज बांधवांचे मोठे नुकसान-चेतन सौंदळे*


 *राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनाने समाज बांधवांचे मोठे नुकसान-चेतन सौंदळे*


*परळी (प्रतिनिधी)*


राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर हे महान तपस्वी व संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे आचार्य होते. त्यांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा झाला होता. अहमदपुरकर महाराज हे समाजासोबतच सर्वांसाठी एक दिशादर्शक होते, त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली या शब्दात नगरसेवक तथा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

परळी शहरात दोन वर्षापूर्वी भव्य दिव्य स्वरूपातील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा पार पडला होता. या सोहळयास डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची मार्गदर्शनपूर्वक अशी उपस्थिती होती. समाजात आतापर्यंत झालेला व सर्वाधिक भाविकांच्या उपस्थितीने चर्चेच्या ठरलेल्या सोहळयास वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी मार्गदर्शन केले होते. आजही या तपोनुष्ठान सोहळयातील त्यांच्या स्मृती आठवणीत असून राष्ट्र संतांचे पाय आमच्या परळीला लागले, आम्हाला त्यांची सोहळयाचा अध्यक्ष म्हणून सेवा करता आली हे माझे परमभाग्य समजतो असेही चेतन सौंदळे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार