MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर पक्षाची मोठी जबाबदारी;भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती

 पंकजाताई मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर पक्षाची मोठी जबाबदारी;भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती



नवी दिल्ली....

      भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आहे.  नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजाताई मुंडे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. 


एकूण 13 जणांना राष्ट्रीय सचिव म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत. मात्र आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. तसेच राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं देखील नाव आहे. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार