MB NEWS:*विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान* • *_भरीव कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक सेवाकर्मींचा डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव_* •

 *विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान*


• *_भरीव कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक सेवाकर्मींचा डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव_* •



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान' देऊन गौरविण्यात आले आहे.भरीव कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक सेवाकर्मींचा विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव करण्यात आला आहे.यामध्ये ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  परळी शहरात कोरोना सेवाकार्य अविरतपणे करणार्या व सर्वस्तरात अत्यावश्यक सर्व कार्ये पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या कार्याची दखल या राष्ट्रीय सन्मानासाठी घेण्यात आली.हा एकप्रकारे तमाम परळीकरांचा सन्मान आहे.


    बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी लॉकडाऊनच्या संपुर्ण काळात अविरतपणे विविध सेवा  पोहचविण्यासाठी योगदान दिले. पिण्याच्या पाण्यापासून तयार जेवणापर्यंत आणि अन्नधान्यापासुन पुस्तक संकलनापर्यंत सेवा प्रदान करण्याचे काम  केले आहे. अन्न-धान्यासाठी अनेकांची होणारी अडचण आपण घरात राहून नव्हे तर बाहेर पडूनच सोडवू शकतो या भावनेतून  सेवा  दिली आहे. दिवस आहे की रात्र, कोरोनाची भिती आहे किंवा नाही याची तमा न बाळगता शहरातील थकलेल्या-भागलेल्या व दोन वेळच्या अन्नांची चिंता असलेल्या अनेकांना मायेचा हात देण्यासोबत त्यांच्या पोटाला  दोन घास मिळण्यासाठी अविरत कार्य केले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात संपूर्ण सुसज्ज कोरोना मदत कक्ष,शहरातील सर्व कार्यालयांना थर्मोस्कॅनर भेट, सर्व शाळा महाविद्यालयात यांना सॅनिटायझर डिस्प्सेन्सर भेट,सावरकर पतसंस्थेचे वतीने 1000 गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नागरिकांना मास्क भेट,मागेल त्याला सॅनिटायजर योजना अविरत चालु, नागरिकांची थर्मोस्कॅनिंग, कार्डियाक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक कोरोना रुग्णांना दवाखान्यात सुखरूप शिफ्टिंग आदी अनेकाअनेक सेवा उपक्रम राबविले.

           विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान' देऊन गौरविण्यात आले आहे. देशभरातील निवडक सेवाकर्मींचा डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव करण्यात आला आहे. यामध्ये देशभरात कोरोना सेवाकार्य अविरतपणे करणार्या प्रदीपकुमार पासवान, पाटणा,प्रा.विजय काकडे, बारामती,डॉ.प्रतापसिंह माने ,पुणे,सुसांता संतारा, प.बंगाल, राजीव बांकर, अकलूज,प्रा.डॉ. अशोककुमार पगारिया, पिंपरी चिंडचड, देवेनचंद्र भुयान,आसाम, मिताली सेन दास,आसाम,अब्दुल रशीद लोन,श्रीनगर,अमित चंद्रकांत तावरे,बारामती,धीरज शरद बागडे,पुणे,सुनील नारायणराव ताकवणे, दौड,मनसुखलाल गोकुलदास गुंदेचा, बारामती, मनीषा नारायणराव ननावरे, इंदापूर, ऍड.नरेश गणपतराव ठाकूर,पनवेल, पोपटलालजी किसनदासजी भंडारी, अहमदनगर, अभिमन्यू धर्मा पाटील,नवी मुंबई,श्रीमती शकुंतलाताई पाचपुते,श्रीगोंदा, डॉ.गोरख साठे,बारामती, काशीराम गोविंदराव पैठणे, देऊळगावराजा, गोरख अंकुशराव बेलदार, तांदुळवाडी, वसंतराव हरिभाऊ भगत, नागपूर, संगीता सूर्यकांत घाडगे,गणेश जयसिंगराव कदम, विशाल पोपटराव जाधव, प्रतापराव पगाळे, बारामती,रमेश कोलप,कोल्हापूर, अनिल जगन्नाथराव सुभेदार, सातारा, प्रमिला राउत, नागपूर, सर्जेराव वाघमारे,वाघोली, स्व.डॉ. विकास आबनावे, पुणे, मनजीतसिंग जसवंतसिंग सुदान, हिमाचल प्रदेश, ममता विश्वासराव गेडाम,नागपूर, इंद्रजितसिंग बोहरसिंग लधार, फरीदकोट, शेखर सपानी, खारघर, डॉ.प्रकाश करमाडकर, भगवान दामोदर लोंढे, इंदापूर, डॉ.सतीश दोशी, सोलापूर,प्रा. माधव वामनराव जोशी, बारामती, डॉ. शरद गायकवाड, कोल्हापूर, लैलाबेन मुबारक नादाफ, अकलूज,रश्मी मेहता,ठाणे, डॉ.नेमीचंद छाछेड, दिल्ली, परुल कुमार,दिल्ली,वंदना लखनपाल, दिल्ली,लिलावती ठक्कर,मुंबई, तुळशीदाव सचदेव, मुलुंड, डॉ.थिंगबैजम भिमोल, मणिपूर, हेमंदचंद्र बर्मन, गुवाहाटी आदीं मान्यवरांचा समावेश आहे. देशातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या यादीत व सन्मानाच्या पंक्तीत परळीतील सतत लोकाभिमुख कामे प्रामाणिकपणे करणार्या बाजीराव भैय्या धर्माधिकारी या युवानेतृत्वाने आपल्या कार्यातून स्थान मिळवले ही तमाम परळीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

  @@@

  *आमचे नेतृत्व व सर्व सहकारी यांच्या कार्याचा हा सन्मान -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

      दरम्यान, हा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात जरी माझा झालेला असला तरी वास्तविक आमचे नेतृत्व ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळात सामुहिकपणे तळमळीने तळागाळातील लोकांपर्यंत सेवाकार्य अविरतपणे करणार्या सर्व सहकारी यांचा हा सन्मान आहे.व्यक्तीगत माझ्यासाठी प्रेरणा देणारा हा सन्मान असून यापुढे ही सुरु असलेली कामे, उपक्रम आणखी गतीने व प्रामाणिकपणे करण्याचा आपला प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान प्राप्त बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार