MB NEWS:वनरक्षक दैवशाला वाघमारेंना व्हरकटवाडीकरांचा सानंद निरोप

 वनरक्षक दैवशाला वाघमारेंना व्हरकटवाडीकरांचा सानंद निरोप



दिंद्रुड प्रतिनिधी


धारुर वनपरिक्षेत्रातील मोहखेड नियत क्षेत्राच्या  वनरक्षक दैवशाला वाघमारे यांची नुकतीच तालुका अंतर्गत बदली पहाडी पारगाव नियतक्षेत्रात झाली. गेली पाच वर्ष मोहखेड बिटातील डोंगर हिरवागार करण्यासाठी मोलाची भुमीका बजावल्याने व्हरकटवाडीकरांनी दैवशाला वाघमारे यांचा निरोप समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला. 

     गेल्या पाच वर्षांत धारुर वनपरिक्षेत्राच्या मोहखेड नियत क्षेत्रातील व्हरकटवाडी,मोहखेड च्या बालाघाट डोंगरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चार लक्ष रोपांची निर्मीती करत बालाघाट डोंगरावर एक लक्ष वृक्षारोपण करत ओसाड डोंगराची हिरवागार डोंगर करण्यासाठी वनरक्षक दैवशाला वाघमारे यांची मोलाची भुमीका राहिली आहे.वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व संगोपन योग्य रितीने केल्यामुळे बालाघाट चा डोंगर आज हिरवागार झाला आहे. मोहखेड बिटातील अतिक्रमण काढत जहाल कामगिरी निभावताना बिटातीलच मोलमजुरी करणार्या मजुरांना रोजगार उपलब्ध करत हाताला काम मिळवुन दिल्याने व्हरकटवाडी व मोहखेड ग्रामस्थांत वाघमारेंची विशेष क्रेझ होती. पानी फाउंडेशन च्या माध्यमातून मोहखेड बिटात ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी डोंगरात मुरण्यासाठी दैवशाला वाघमारे यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.

    व्हरकटवाडी च्या सरपंच ललिता व्हरकटे यांनी व्हरकटवाडी ग्रामस्थांच्या वतीने वनरक्षक दैवशाला वाघमारे यांना साडी चोळी भेट देत सत्कार केला या प्रसंगी धारुर वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुंद मुंडे, तालुका वनपाल शंकर वरवडे, मोहखेड नियतक्षेत्राचे नुतन वनरक्षक मल्हारी सावंत, रामकिसन व्हरकटे,मुरलीधर व्हरकटे, सामाजिक कार्यकर्ते संतोष स्वामी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार