MB NEWS:शेती नुकसानीचे पंचनामे करा व हेक्टरी ५०,००० रु.नुकसान भरपाई द्या-साईराजे देशमुख

 शेती नुकसानीचे पंचनामे करा व हेक्टरी ५०,००० रु.नुकसान भरपाई द्या-साईराजे देशमुख



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       तालुक्यात मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५०,०००₹ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी अ.भा.छावा संघटनेच्या वतीने साईराजे देशमुख यांनी केली आहे.

 या.  तहसीलदार यांना  निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, या महिन्यात सतत पाऊस पडत असून खरिप २०२० चे शेतकऱ्यांच्या शेतीमधील सोयाबीन,कापूस, तर पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या चा विचार करत आहे.परळी तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाली तर अखिल भारतीय छावा संघटना शांत बसनार नाही. खुप नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी  मदत करून शेतकऱ्यांना मदत करावी व येणाऱ्या १०दिवसात जर मदत जाहीर नाही झाली तर तहसील कार्यालयाला कुलूप ठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  यावेळी साईराज देशमुख यांच्यासह अमर सुरवसे(शहर अध्यक्ष),किरण दळवे पाटील (शहर उपाध्यक्ष),अबंर सारडा(वि.आ.शहर अध्यक्ष),कृष्णा दिवटे(वि.आ.शहर उपाध्यक्ष),सुनील गरड,गोपाळ उदरे, विकास कुंभार,प्रणव स्वामी, अभिषेक संगेवार आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !