परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीचे निमंत्रण
विनायक मेटे यांनी घेतली उदयनराजे व शिवेंद्रराजे यांची भेट
खासदार उदयनराजे यांनी मेटे यांच्याशी चर्चा करताना आजवरचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप केला, यापुढे उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला, तर शिवेंद्रराजे यांनी मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे त्यासाठी समाज जी भूमिका घेईल त्या सोबत राहू असा शब्द दिला. विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबरच्या बैठकीत योग्य निर्णय व दिशा मिळेल असे सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक शरद काटकर, हरीष पाटणे, सुनील काटकर, अमोल मोहिते, राजू भोसले, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अनिल देसाई, भालचंद्र निकम, विक्रम पवार, युवराज ढमाळ आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा