MB NEWS:अंतिम वर्षाच्या परीक्षा: विद्यार्थ्यांनी आँनलाईन, आँफलाईन चा पर्याय लवकरात लवकर निवडावा.. प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर

 बीए,बीकाँम, बीएस्सी अंतिम वर्षाची परिक्षा १ आँक्टोबर पासून.*


*अंतिम वर्षाच्या परीक्षा: विद्यार्थ्यांनी आँनलाईन, आँफलाईन चा पर्याय लवकरात लवकर निवडावा.. प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर*






*परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         यंदा कोविड विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मार्च ,एप्रिल मध्ये होणाऱ्या सर्व परिक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे बंधनकारक असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परिक्षा १ आँक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला योग्य तो पर्याय निवडावा असे आवाहन लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. परळीकर यांनी केले आहे.

                   डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० मध्ये होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परिक्षा व इतर सत्र वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा १ आँक्टोबर पासून सुरु होणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांना याचा संसर्ग होवू नये म्हणून ही परिक्षा विद्यार्थ्यांना आँनलाईन किंवा आँफलाईन पध्दतीने महाविद्यालयात देता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदर योग्य पर्याय निवडायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटसह मोबाईल, आयपँड, संगणक उपलब्ध आहे, त्यांच्या घराजवळच्या विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, एमकेसीएल केंद्राकडून उपलब्ध होत असेल त्या विद्यार्थ्यांनी ही परिक्षा आँनलाईन पध्दतीने द्यावी. ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही. त्या़ची परिक्षा ही निवडलेल्या महाविद्यालयाकडे ओएमआर पध्दतीने त्या महाविद्यालयात देता येईल. कोविड च्या प्रादुर्भावामुळे ही परिक्षा एका तासाची बहूपर्यायी पध्दतीने होणार आहे. विद्यापीठाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार आँफलाईन, आँनलाईन या दोन्ही पैकी एका पध्दतीने विद्यार्थ्यांना परिक्षा देता येणार आहे. तसेच ज्यांनी आँनलाईन पर्याय निवडला आहे. त्याची परिक्षा सकाळी ९ ते १ पर्यंत व दुपारी २ ते ६ यावेळेत कोणत्याही एका तासात सोडवायची आहे. ज्यांनी आँफलाईन पर्याय निवडला आहे. त्यांची परिक्षा महाविद्यालयात सकाळी ९ ते १ यावेळेत पहिल्या तासात म्हणजे ९ ते १० या वेळेत व दुसऱ्या सत्राची परिक्षा २ ते ६ वेळेमधील २ ते ३ या वेळेत देणे बंधनकारक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही परिक्षा आँनलाईन पध्दतीने द्यावी. यासाठी महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग्य तो पर्याय लवकरात लवकर निवडावा असे आवाहन प्राचार्या डॉ. परळीकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !