MB NEWS:*इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी*

 


*इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी*



बीड, दि. २::-इतर मागास प्रवर्गातील होतकरू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांचे अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येते या योजना ऑनलाईन असून www.msobcfdc.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी .


इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय बीड मार्फत बीड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील होतकरू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येते सन 2020 --21 या आर्थिक वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प रक्कम रुपये 2.50 (अडीच) लक्ष रुपये पर्यंत २७ भौतिक उद्दिष्ट  देण्यात आले असून थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्प रक्कम एक लाख पर्यंत १०० भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहे . तसेच दहा लक्ष पर्यंतचे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 50  उद्दिष्ट आहे.  १० ते ५० लक्ष रुपये पर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 12 भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहेत पात्र ओबीसी प्रवर्गातील गरजूंनी  महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन एस. आर. गुठे , जिल्हा व्यवस्थापक बीड यांनी केले आहे

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !