MB NEWS:*झोपडपट्टी मुक्तीकडे धनंजय मुंडे यांचे पहिले पाऊल; परळीत राबविणार बारामती पॅटर्न!*

 *झोपडपट्टी मुक्तीकडे धनंजय मुंडे यांचे पहिले पाऊल; परळीत राबविणार बारामती पॅटर्न!*



*निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे मुंडेंचे महत्वपूर्ण पाऊल!*


*भूमापन सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे परळीकरांना केले आवाहन*


परळी (दि. ०४) ---- : निवडणूक काळात परळीकर नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या दिशेने परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले असून, परळी शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यासाठी परळीत बारामती पॅटर्न राबविणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


शासनाच्या सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत परळीतील विविध स्तरातील गरीब *नागरीकांचे*, उपलब्ध जागेनुसार सर्वेक्षण केले जाईल व त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो राज्य *सरकारकडे* मांडण्यात येऊन सादरीकरण करण्यात येईल. यासाठी सर्व्हे करण्यासाठी येत असलेल्या नगर परिषद व नगर भूमापन अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करून योग्य माहिती द्यावी असे आवाहनही ना. मुंडे यांनी परळीकरांना केले आहे.


घरांच्या व बांधकाम साहित्याच्या किंमती एकीकडे गगनाला भिडत आहेत तर लॉकडाऊन मुळे परळी तालुक्यातील हजारो कामगारांना जगवणारा विट भट्टी उद्योगही सध्या अडचणीत आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरिकांना स्वस्तात पक्की घरे मिळावीत या शासनाच्या धोरणास अनुसरून सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत परळीत बारामती पॅटर्न राबविण्याचा मानस असल्याचे ना. मुंडे म्हणाले.


यासाठी सर्वांसाठी घरे व अन्य योजनांची सांगड घालत प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात येणार असून यासाठी भूमापन सर्व्हे करण्यात येत आहे. यासाठी आपल्याकडे येणाऱ्या नगर परिषद व नगर भूमापन अधिकारी / कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार