“आरोग्य सेवा अधिनियम करण्याची गरज "-डॉ. अभय शुक्ला
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डॉ द्वारकादास लोहिया यांच्या स्मृती दिन निमित्ताने मानवलोक संस्थेमध्ये कार्यवाह श्री अनिकेत लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयावर व्याख्यानमाला शृंखला आयोजित करण्यात येत आहे.
दि. 12.09.2020 रोजी मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथे डॉ द्वारकादास लोहिया व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ. अभय शुक्ला, सहसमन्वयक जनस्वास्थ्य अभियान यांनी "कोरोना संकटाच्या काळात तरुणांचा सहभाग : आरोग्य सेवेतील बदल व कृतिकार्यक्रम" या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ अभय शुक्ला पुढे म्हणाले कि पाश्चिमात्य देशामध्ये ८८३ डॉलर प्रती व्यक्ती आरोग्यावर खर्च करतात. श्रीलंका ७० डॉलर प्रत्येक व्यक्ती खर्च करते. तर भारतात १९ डॉलर प्रती व्यक्ती खर्च केला जातो म्हणून भारतीय आरोग्य सेवेमध्ये आधुनिक आणि मोठे बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पुढे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले कि शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांचा अभाव, सेवा सुविधांची कमतरता असल्याने शासकीय रुग्णालयात लोक न जाता खाजगी रुग्णालयाकडे आरोग्य सेवा घेण्यासाठी जातात. त्यामुळे लोकांना अत्यावश्यक योग्य सेवा मिळविण्यासाठी भारतामध्ये आरोग्य सेवा अधिनियम करण्याची गरज आहे. गेल्या तीन दशकापासून आरोग्य सेवा कमकुवत झाली आहे. महाराष्ट्रात फक्त २२ % लोक शासकीय आरोग्य सेवेचा लाभ गेतात. या वेबिनार मध्ये महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजीक संस्थातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेबिनारचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉ. नजीर शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश जाधव, सहसमन्वयक डॉ. हनुमंत साळुंके, इरफान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा